सोलापूर : शहरातील रस्ते बनवण्याचे कोट्यवधींचे कंत्राट महापालिकेने ठेकेदाराला दिले होते. मात्र काही दिवसांत या रस्त्यांची वाट लागल्यानंतर त्रयस्त यंत्रणेमार्फत या रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यात कंत्राटदारांनी रस्त्याच्या तोंडाला नुसतेच डांबर फासून रस्ते तयार केल्याचे दाखवत पालिकेलाच चुना लावल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे खवळलेल्या आयुक्तांनी पालिकेला बनवणाऱ्या कंत्राटदारांना ते रस्ते पुन्हा बनवण्याचा आदेश काढला आहे. परिणामी कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत. Asphalt was torn on the road, lime was applied to the municipality, commissioner said to build 8 roads in the city again P Shivshankar
सोलापूर महापालिका प्रशासनाकडून गुणवत्तेनुसार रस्त्याची कामे न करणाऱ्या मक्तेदारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यापैकी दर्जाहीन काम झालेल्या ८ रस्त्यांचे काम पुन्हा करण्याचे आदेश संबंधित मक्तेदारांना दिले आहेत. काम न केल्यास संबंधित मक्तेदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला आहे.
सोलापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. बहुतांश रस्ते खराब झाले आहेत. दुसरीकडे जे रस्ते महापालिकेने केले आहेत, ते रस्ते काही महिन्यातच उखडले आहेत. याबाबत अनेक नगरसेवक आणि संघटनांनी आवाज उठवला होता. त्यानंतर आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन थर्डपार्टीकडून शहरातील रस्त्यांच्या गुणवत्तेची तपासणी केली. यामध्ये तब्बल ३१ कामे ही दर्जाहीन असल्याचे स्पष्ट झाले होते. त्या ३१ मक्तेदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या.
मक्तेदारांकडून उत्तर प्राप्त झाले. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी ५ मक्तेदारांना रस्ते पुन्हा करण्याचे आणि काही मक्तेदारांना जेवढे काम गुणवत्तेनुसार केले तेवढे बिल देण्याचा निर्णय घेतला. या तपासणीमध्ये सुरुवातीला ७ दिवस, त्यानंतर १४ दिवस आणि त्यानंतर २८ दिवसांनी या रस्त्यांची तपासणी करण्यात आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यात ७ आणि १४ दिवसांच्या तपासणीत १३ मक्तेदारांनी केलेल्या रस्त्यांची कामे फेल झाल्याचे निदर्शनास आले. मात्र नंतर २८ दिवसांनी केलेल्या तपासणीनंतर ती कामे नियमानुसार झाल्याचे आढळून आले. दुसरीकडे १० मक्तेदारांनी केलेल्या कामात काही ठिकाणी डांबरीकरणाचे थर कमी आढळले आहेत. त्यामुळे या दहा रस्त्यांच्या मक्तेदारांना जेवढे काम केले तेवढेच बिल अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित ८ रस्त्यांची कामे पूर्णपणे दर्जाहीन आढळली.
रस्त्यावरील खडी निघणे, डांबराचे प्रमाण कमी असणे आदी त्रुटी या कामामध्ये काढण्यात आल्या. त्यामुळे ही ८ कामे पुन्हा करण्याचे आदेश संबंधित मक्तेदारांना पालिका आयुक्तांनी दिले. ही आठ कामे ५ ठेकेदारांनी घेतली आहेत.
– १३१ रस्त्यांच्या कामांची तपासणी
महापालिकेने थर्डीपार्टीकडून तब्बल १३१ रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेची तपासणी केली. त्यानंतर पार्टीच्या अहवालात ३१ मक्तेदारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्या मक्तेदारांनी नोटिसीला उत्तर दिल्यानंतर आयुक्तांनी कारवाईचा निर्णय घेतला.
– दर्जाहीन झालेले आठ रस्ते
विजय कन्स्ट्रक्शन (प्रभाग क्रमांक २, डांबरी रस्ता काम), वैष्णवी कन्स्ट्रक्शन (प्र. क्रमांक ९, स्वातंत्र्य सैनिक नगर, एक डांबरी रस्त्याचे काम), बी. एच. कन्स्ट्रक्शन (प्र. २३, राजस्व नगर १ डांबरी रस्त्याचे काम), सचिन भोसले कन्स्ट्रक्शन (प्र. २४ तीन डांबरी रस्त्यांची कामे), ए. के. कन्स्ट्रक्शन (प्र. – क्रमांक २२, एका रस्त्याचे काम)
– तर संबंधित मक्तेदारांवर कडक कारवाई : आयुक्त
पालिकेच्या तपासणीत ८ रस्ते दर्जाहीन आढळले आहेत. त्यांना पुन्हा नव्याने पूर्ण रस्ते करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना यासाठी मुदत दिली आहे. त्या मुदतीत त्यांनी ही कामे न केल्यास संबंधित मक्तेदारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यापुढेही कोणत्या कामाची तक्रार आल्यास त्याची पडताळणी करण्यात येईल, असे पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
– एका रस्त्याची किंमत साधारण ५ लाख
आयुक्तांनी ५ मक्तेदारांचे ८ रस्ते पुन्हा नव्याने करण्याचे आदेश दिले आहेत. एका डांबरी रस्त्याची किंमत अंदाजे ५ लाख रुपये आहे. त्यामुळे जवळपास ४० लाखांचे रस्ते पुन्हा करावे लागणार आहे. या ८ मध्ये एका मक्तेदाराचे तीन रस्ते दर्जाहीन आढळून आले आहेत.
□ गौरी पूजन निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!
गौरी गणपतीच्या आगमना, सजली अवधी धरती, सोनपावलाच्या रुपाने ती येवो आपल्या घरी, होवो आपली प्रगती, लाभो आपणास सुख समृद्धी.
आज गौरी पूजन – पाहा शुभ मुहूर्त –
#मुहूर्त #Today
यंदा ज्येष्ठागौरी शनिवारी 3 सप्टेंबरला येत आहे.
#ज्येष्ठागौरी #surajyadigital #सुराज्यडिजिटल #jyeshthagouri
– ज्येष्ठागौरी आवाहन शुभ मुहूर्त – पहाटे 6.03 पासून ते संध्याकाळी 6.36 पर्यंत
#ज्येष्ठागौरी #auspicious #moments
– ज्येष्ठागौरी पूजा मुहूर्त – 3 सप्टेंबरला रात्री 11 वाजेपासून 4 सप्टेंबर रात्री 9.40 वाजेपर्यंत
#gouri #gourilakshmi
– गौरी विसर्जन मुहूर्त 5 सप्टेंबरला दुपारी 12.23 ते संध्याकाळी – 7.23 वाजेपर्यंत