केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याला काही प्रमुख राजकीय अर्थ देखील सांगितले जात आहेत. देशातील सर्वाधिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याचे फडणवीस यांचे मिशन आहे. सोबतच येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये राज्यातल्या 18 प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती ठरण्याची शक्यता आहे. Show Uddhav Thackeray his place: Amit Shah Union Home Minister Mumbai tour
□ ‘केवळ 2 जागांसाठी शिवसेनेने…’; अमित शहांचा गौप्यस्फोट
मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांची येथे मेघदूत बंगल्यावर भाजप पदाधिकाऱ्यांशी बैठक पार पडली आहे. यामध्ये त्यांनी एक खुलासा केला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत केवळ 2 जागांसाठी शिवसेनेने भाजपशी युती तोडली आहे, असा त्यांनी गौप्यस्फोट केला आहे. तसेच शहा यांनी आगामी मुंबई महानगर पालिकेत 150 जागा जिंकायचे टार्गेट ठेवले आहे.
गृहमंत्री अमित शहा काल रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले आणि आता ते दोन दिवसांच्या दौऱ्यावर सक्रिय झाले आहेत. ते आज पहाटे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याशिवाय इतर अनेक नेते उपस्थित होते. अमित शहा यांनी पत्नी आणि नातवासोबत गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
गृहमंत्री अमित शहा सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचले. यादरम्यान शहा यांनी शिंदे यांच्या घरी गणेशोत्सवाला हजेरी लावली. तसेच गणपती बाप्पाची पूजा केली. अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी लालबागचा राजा पंडाल येथे पूजा केली. प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीचे दर्शन घेऊन त्यांनी देवाचे आशीर्वाद घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. येथून शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचून गणेश पूजेला हजेरी लावली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राजकारणात कोण कधी कोणाविरोधात जाईल सांगता येत नाही. उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती तोडून आघाडी जवळ केली तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्यावर अमित शहांचा रोष आहे. भाजप पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत, अमित शाह यांनी “उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवा, राजकारणात काहीही सहन करा पण धोका नाही. मुंबईत भाजपचेच वर्चस्व हवे” असे वक्तव्य केले आहे.
वर्ष 2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती असा गौप्यस्फोट शाह यांनी केला. भाजपने कधीच छोटा भाऊ मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.
अमित शहा यांच्या दौऱ्याला काही प्रमुख राजकीय अर्थ देखील सांगितले जात आहेत. देशातील सर्वाधिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याचे फडणवीस यांचे मिशन आहे. सोबतच येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये राज्यातल्या 18 प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती ठरण्याची शक्यता आहे.
● अमित शहा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हणाले…
* राजकारणात धोका देणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं मैदानात येणे गरजेचे.
* आगामी मुंबई महानगर पालिकेत आपल्याला 150 जागा जिंकायच्या आहेत.
* उध्दव ठाकरेंना जागा दाखवायची वेळी आली आहे.
* भाजपने कधीही मोठा भाऊ- छोटा भाऊ म्हटले नाही..
* महाराष्ट्रातील हिंदू विरोधी राजकारण आपल्याला संपवायचे आहे.