सोलापूर : पक्षात इन्कमिंग म्हणजे काय असते हे १७ सप्टेंबर नंतर सोलापूरकरांना दिसेल. १७ सप्टेंबरनंतर अनेकजण शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत अनेक पक्षांना दे धक्का देत लवकरच मेगा भरती होणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. Meaning of incoming will be understood after September 17, will give shock to many parties – Tanaji Sawant Solapur Shindegat Shiv Sena
प्रियदर्शन साठे मित्रपरिवार आणि सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनतर्फे हेरिटेज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिवसेना (शिंदे गट) पक्षप्रवेश कार्यक्रमात सोमवारी रात्री ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनीष काळजे, शहरप्रमुख मनोज शेजवाल, संयोजक प्रियदर्शन साठे, मनोज साठे, आशिष परदेशी, दीपक पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक महादेव बिद्री, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष विशाल कल्याणी, आशिष परदेशी, प्रविण बिराजदार, मोहसीन जमादार आदी विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना भगवे उपरणे परिधान करून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, ही फक्त सुरुवात आहे. आगामी काळात सोलापूर महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत इनकमिंग होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे. २०२४ पर्यंत राज्य विकासात आघाडीवर नेण्याचा संकल्प शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने केलेला आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
□ शिवसेना आमचीच !
शिंदे गट वगैरे काहीही अस्तित्वात नाही. खरी शिवसेना आमचीच आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली हिंदुत्वाची विचारधारा पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत, असेही मंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले.
सप्टेंबर नंतर मेगा भरती होणार असल्याचे सावंत आणि जाहीर करतात एकनाथ शिंदे गटांमध्ये कोण प्रवेश करणार याबाबत चर्चा चालू आहे, कुठल्या पक्षाला धक्का बसणार कुठल्या पक्षातील नेते मंडळी जाणार याबाबत याबाबतच्या चर्चेला उधाण आलय.
चौपाड येथे थोरला मंगळवेढा
तालीम गणेश मंडळात सहभागी
होऊन तानाजी सावंत यांनी लेझीमवर ठेका धरला
■ आरोग्य मंत्री सावंत यांच्या दौऱ्या पूवी शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी
मोहोळ : मोहोळ येथे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. मोहोळ येथे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे येण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर शिवसैनिकांनी जोरदार त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
घोषणाबाजीसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
पोलिसांनी तात्काळ त्यांना गरडा घालून ताब्यात घेतले तरी त्यांची घोषणाबाजी चालू होती. यामध्ये युवा सेनेचे जिल्हा प्रमुख महेश देशमुख, सचिन जाधव , हर्षल देशमुख, भूषण शिंदे , निलेष गायकवाड , गणेश गोडसे यांना तात्काळ ताब्यात घेवून काही वेळाने सोडून देण्यात आले.