मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे व काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील मढ मार्वे येथील अवैध स्टुडिओ प्रकरणी या दोघांची चौकशी होणार आहे. मुंबई महापालिकेकडून याप्रकरणी एका चौकशी समितीची स्थापना केली आहे. महापालिका उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती याप्रकरणाची चौकशी करणार आहे. 4 आठवड्यांमध्ये या समितीला अहवाल सादर करायला सांगितले आहे. Aditya Thackeray’s trouble increases, probe ordered into Aslam Sheikh illegal studio case
भ्रष्टाचाराचे किंवा अवैध काम करण्याचे आरोप लागले की, राजकारणी हा चौकशीच्या फेऱ्यात अडकतोच. आदित्य ठाकरे विरोधात मुंबई महापालिकेकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. मढ मार्वे येथील अवैध स्टुडिओ प्रकरणी आदित्य ठाकरे आणि असलम शेख हे या चौकशी समितीच्या रडारवर असणार आहेत.
मालाड, मार्वे आणि लगतच्या भागात सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) सह 49 बेकायदेशीर स्टुडिओचे बांधकाम आणि एमडीझेड (सागरी संरक्षण क्षेत्र) चं उल्लंघन केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. 2021 – 22 मध्ये नोटीसा देखील बजावण्यात आले आहेत. चौकशीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. हजारो चौरस फुटाचे अवैध बांधकाम केल्याचा आरोप असल्याने, यामध्ये अनेक बीएमसी चे अधिकारी अडकण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महापालिका उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती याप्रकरणाची चौकशी करणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या समितीची स्थापना केली आहे. त्यांचा अहवाल ४ आठवड्यांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालाडच्या मढ, मार्वे, इरानगल आणि भाटी येथे ४९ बेकायदेशीर स्टुडिओ बांधल्याचा आरोप केला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
बीएमसीनं चौकशीचे आदेश दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आरोप केला की, चौकशी पूर्ण झाल्यानंतर हे सिद्ध होईल की, उद्धव ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले असलम शेख आणि आदित्य ठाकरे हे या घोटाळ्यात सहभागी होते. मढ मार्वे येथे तयार करण्यात आलेल्या ४९ फिल्म स्टुडिओंच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. याप्रकरणी CRZ आणि NDZ च्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप केला जात आहे.
आरोपांचं गांभीर्य आणि बेकायदा बांधकामाची तक्रार पाहता उपायुक्त हर्षद काळे यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. काळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ४ आठवड्यांत अहवाल सादर करतील. त्याचबरोबर दोषींवर कारवाई करण्याची शिफारसही करणार आहेत. आयुक्त चहल यांनी सात मुद्द्यांवर तपास प्रक्रिया पुढे नेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता बीएमसीचे अनेक अधिकारीही अडकण्याची भीती आहे.
□ रशियात अण्णाभाऊंचा पुतळा, अभिमानास्पद बाब !
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे काही काळ ज्या रशियात वास्तव्याला होते, त्या रशियाची राजधानी मॉस्को येथील शासकीय वाचनालयात अण्णाभाऊंचा पुतळा उभारला जाणार आहे, ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. देवेंद्र फडणवीस हे पुढच्या आठवड्यात रशियाच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते 14 सप्टेंबरला या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि रशिया सरकारचे मनःपूर्वक आभार !
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मॉस्कोच्या शासकीय वाचनालयात लावला जाणार आहे, ही अतिशय गौरवाची आणि प्रेरणादायी बाब आहे.
अण्णाभाऊंचे रशियात अनेक महिने वास्तव्य होते.
मी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जी त्या अनावरण समारंभासाठी रशियाला जाणार आहोत.@rahulnarwekar #Russia pic.twitter.com/uVvAmXm7Xt— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) September 7, 2022
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात येत आहे. मॉस्कोमध्ये त्यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढच्या आठवड्यात रशियाच्या दौऱ्यावर आहे. त्यावेळी त्यांच्या हस्ते 14 सप्टेंबरला या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. ‘रुडमिनो मागरिट फॉरेन लँग्वेज स्टडी’ या संस्थेने लोकशाही अण्णा भाऊ साठे यांचा हा पुतळा उभारला आहे.