बीड /पुणे : विनायकराव मेटे यांचे १४ ऑगस्ट रोजी निधन झाले. पुण्यात मंगळवारी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत दिवंगत मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांची शिवसंग्राम संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्वानुमते नियुक्ती केली आहे. विनायक मेटे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसंग्राम संघटनासोबतच आहे, असे मत डॉ. ज्योती मेटे यांनी व्यक्त केले. Now Dr. Beed Assistant Commissioner Jyoti Mete’s request to take the axis of Shiv Sangram to the Legislative Council
विनायक मेटे यांच्या निधनानंतर ‘शिवसंग्राम’ची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झालाय. याचं उत्तर शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच शोधलयं. विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामचं नेतृत्व करावं अशी मागणी शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीला ज्योती मेटे या देखील उपस्थित होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी ज्योती मेटे यांना पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी केली. आजच्या राज्यकारिणीत नेतृत्वाची धुरा देण्याचा निर्णय जो घेतलाय त्यासंदर्भात मी योग्य तो निर्णय घेईन असे ज्योती मेटे म्हणाल्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
विनायक मेटे यांच्या निधनानंतर संघटना नेतृत्वहीन आहे. अनेक प्रश्न घेऊन शिवसंग्राम पक्ष लढत होता. विनायक मेटेंच्या उमेद्वारीबाबत भाजप आणि शिवसेना युतीने निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी एक जागा ज्योतीताई मेटे यांना द्यावी. शिवसंग्रामसाठी दिलं जाणारं विधानपरिषद सदस्यत्व आणि विधिमंडळात स्थान दिलं पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे.
येत्या दोन ते तीन दिवसात शिवसंग्रामचे शिष्टमंडळ भाजपचं नेतृत्वाला भेटणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांची देखील हे शिष्टमंडळ भेट घेऊन विधानपरिषद सदस्यत्वाची मागणी करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
14 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर पहाटे साडेपाचच्या सुमारास विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. विनायक मेटे यांच्या कारला एका ट्रकने दोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मेटेंचा मृत्यू झाला.
विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे या नाशिक येथे धर्मादाय कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. मेटे यांच्या निधनानंतर त्या सातत्याने कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. परंतू पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेण्याबाबत ज्योती मेटे यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नव्हता.
विनायक मेटे समर्थकांकडून ज्योती मेटे यांनीच जबाबदारी घ्यावी, असा हट्ट धरला जात होता. परंतु त्या प्रशासकीय अधिकारी असल्याने काय निर्णय घेतात? याकडे लक्ष लागले होते. राज्यात सर्वत्र चर्चा होत असली तरी ज्योती मेटे यांनी याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. पण त्यांनी आता खंबीर निर्णय घेतला आहे.
शिवसंग्राम स्थापनेचा मूळ उद्देश तडीस नेला जाईल. मराठा आरक्षण, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तसेच विविध जाती -धर्मातील आरक्षण तथा उपेक्षित असणारे सर्व प्रश्न आपण संघटित होऊन यासाठी मोठा लढा उभा करून ते भविष्यात सोडवणार आहोत. तसेच शिवसंग्राम संघटनेची ही मोठी इमारत बेवारस सोडली जाणार नाही. विनायक मेटे यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसंग्राम संघटनासोबतच आहे, असे मत डॉ. ज्योती मेटे यांनी व्यक्त केले.
● विधान परिषदेवर घेण्याची मागणी
सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय असलेल्या विनायक मेटे यांनी पुढे शिवसंग्राम या आपल्या स्वत:च्या पक्षाची स्थापना केली. मेटे यांच्या शिवसंग्रामने महायुतीद्वारे भाजपला आपला पाठिंबा दिला होता. भाजपच्या मदतीने ते विधानपरिषदेवरही गेले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वीच त्यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपली. त्यामुळे मेटे यांना ‘सरप्राइज गिफ्ट’ दिलं जाईल, असं म्हणत भाजप नेतृत्वाने त्यांना पुन्हा विधानपरिषद आमदार म्हणून संधी देण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर भाजपने विनायक मेटे यांना दिलेलं आश्वासन त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी विधानपरिषदेवर घेऊन पूर्ण करावं, अशी मागणी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.