□ ‘तूर्तास निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये’
मुंबई : सुप्रीम कोर्टात आज राज्यातील सत्तासंघर्षाबाबत घटनापीठासमोर सुनावणी झाली. यावेळी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवा, अशी विनंती शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टाला केली. तर चिन्हाच्या आधी आमदारांच्या आपात्रतेबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती ठाकरे यांच्या वकिलांनी केली. त्यानंतर या सर्व प्रकरणावर घटनापीठ 27 सप्टेंबरला सुनावणी करणार, असे कोर्टाने आज स्पष्ट केले आहे.. त्यामुळे सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. Freeze bow and arrow symbol, Shinde group demands; Court demanded invalid Uddhav Thackeray Shiv Sena
सर्वोच्च न्यायालयाने आज राज्यातील सत्तासंघर्षाबाबत पुन्हा एकदा सुनावणी केली. निवडणूक आयोगाला त्यांचा निर्णय घेण्यासंदर्भात दिलेली स्थगिती द्यावी, अशी विनंती शिंदे गटाने कोर्टाला केली होती. मात्र तूर्तास निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवण्यासंदर्भात किंवा इतर निर्णय घेऊ नये, 27 सप्टेंबरला पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी केली जाईल, यावर घटनापीठ निर्णय घेईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
घटनापीठाच्या ५ न्यायमूर्तींसमोर आजची सुनावणी पार पडली. दरम्यान, सुनावणी सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या गटाने एक मोठी खेळी खेळली. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी थेट धनुष्यबाण हे चिन्हं गोठवण्यात यावं असा युक्तिवाद केला. शिंदे गटाकडून हा युक्तीवाद करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, घटनापीठाने शिंदे गटाचा हा युक्तीवाद मान्य केला नाही. यासंदर्भात निवडणूक आयोग आणि शिवसेनेची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. त्यानंतरच या प्रकरणावर घटनापीठ सुनावणी देणार आहे.
आज घटनापीठासमोर सुनावणीला सुरूवात होताच, शिंदे गटाच्या वकिलांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली. कायद्यानुसार पक्षचिन्हाबाबतचे सगळे निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतं, आयोगाची कार्यवाही कोर्टाने थांबवू नये, असा युक्तिवादही शिंदे गटाच्या वकिलांनी केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शिंदे गटाच्या युक्तिवादानंतर चिन्हाचा निर्णय घेण्याआधी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घ्या, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. यावर कोर्टाने शिंदे गटाच्या वकिलांना प्रतिप्रश्न करत आतापर्यंतच्या ऑर्डरमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीमध्ये काही आदेश दिलेले आहेत का? असं विचारलं. त्यावर लेखी उल्लेख नसल्याचं शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं.
दरम्यान, कोर्टाने शिंदे गटाकडून धनुष्यबाण गोठवण्याची करण्यात आलेली मागणी अमान्य करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २७ सप्टेंबर रोजी होईल, असं घटनापीठाने स्पष्ट केलं. इतकंच नाही तर, शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने २७ तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सुद्धा घटनापीठाने दिले.
थोडक्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी नव्याने स्थापन झालेल्या घटनापीठासमोर आज झाली. अगदी १० मिनिटांच्या सुनावणीत न्यायालयाने महत्तपूर्ण आदेश देत, शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने २७ तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत.
□ ठाकरे गटाला मिळाला वेळ
शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने २७ तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये. आम्ही २७ तारखेला दोन्ही गटांचा १० मिनिटे युक्तीवाद ऐकू आणि नंतर त्यावर निर्णय घेऊ. तोपर्यंत आयोगाने निर्णय घेऊ नये, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. सुप्रीम कोर्टाचे हे निर्देश उद्धव ठाकरे यांना दिलासा मानण्यात येत आहे. कारण निवडणूक आयोगाने शिवसेनेला कागदपत्रं सादर करण्यासाठी वेळ दिली होती. ती वेळ आणखी वाढवून देण्यात यावी, अशी विनंती ठाकरे गटाने केली होती.
मात्र ठाकरे गटाच्या विनंतीला शिंदे गटाने आक्षेप घेतला होता. आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी अपेक्षीत आवश्यक वेळ मिळाला आहे.