सांगली : शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी उद्धव ठाकरे साथ सोडली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले. या बंडखोर आमदारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व केलं. त्यानंतर पुन्हा शिवसेनेतील काही आमदार दसरा मेळाव्याला शिंदे गटात सामील होणार असा दावा आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. MLA from Shiv Sena will join Shinde group at Dussehra gathering: MLA Shahajibapu Patil Sangli Miraj
मिरजेत वीर शिवा काशीद प्रवेशद्वाराचे उद्घाटन व गणेश तलाव येथे ७१ फुटी भगव्या ध्वजाचे अनावरण कामगारमंत्री सुरेश खाडे व आमदार पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप नेते मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, सभापती निरंजन आवटी, नगरसेवक संदीप आवटी, मोहन वनखंडे, गणेश माळी, नगरसेविका अनिता वनखंडे उपस्थित होते.
शिवसेनेच्या ठाकरे गटातील आणखी काही आमदार दसरा मेळाव्याच्या शिंदे गटात येण्याची शक्यता आहे, असा दावा शहाजी बापू यांनी केला आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील मिरज येथे शहाजी बापू पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी शरद पवारांच्या राजकारणावर आणि शिवसेनेवर त्यांनी भाष्य केले.
राज्यात राजकीय क्रांती घडल्याने अस्वस्थ झालेले महाविकास आघाडीचे नेते आमच्यावर टीका करत आहेत. आम्हाला पेटीही बघायला मिळाली नाही, मात्र विरोधक खोकी मिळाल्याचे सांगत आहेत. उध्दव ठाकरे आणि आताच्या सरकारमध्ये जमीन आसमानचा फरक असून, महाविकास आघाडीची सत्ता असतानाची कामे झाली नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना होत आहेत, अस ही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
□ …. हे विसरता येणार नाही
शहाजी बापू पाटील म्हणाले, ‘राजकारणात शरद पवार हे मोठे नेते आहेत. मात्र, देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा पराभव झाला होता. त्यामुळे निवडणुकीचा हा महिमा असून कोणाला निवडायचं आणि पराजित करायचं हे जनता ठरवत असते’. ‘तर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असताना, शरद पवारांची एक निवडणूक फार गाजली होती. हे सुद्धा विसरता येणार ‘नाही’, असेही शहाजी बापू यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 राष्ट्रवादीचा एकही नेता वर्षावर नाही, पण पार्थ पवारांनी लावले हजेरी
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू “आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पुन्हा ॲक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे पार्थ पवार यांचे स्वागत मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं.
मागच्या वर्षी राज्यात आघाडीचे सरकार होते. तेव्हा शरद पवार यांनी वर्षावर गणपतीच्या दर्शनाला हजेरी लावली होती. यंदा मात्र अद्याप राष्ट्रवादीचा कोणताही नेता वर्षावर फिरकलेला नाही. यंदाच्या गणेशोत्सवाला राजकीय सत्तानाट्याची जोड लाभल्याने यंदाचा गणेशोत्सव केवळ सण न राहता तो राजकीय इव्हेंट झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर स्वकीय, समर्थकांसह विरोधकाच्याही घरी जावून बप्पांचे दर्शन घेतले. यावरूनच खासदार सुप्रिया सुळे यांनी टीव्ही लावला की मुख्यमंत्री कोणाच्या ना कोणाच्या घरी गणपतीचे दर्शन घेत असल्याचे दिसत असल्याचे म्हटलंय.
पार्थ पवार यांनी काल बुधवारी (७ सप्टेंबर) वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. पार्थ हे वर्षा निवासस्थानी गेल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, एकीकडे भाजपने मिशन बारामती सुरू केले असतानाच पार्थ हे शिंदेंच्या निवासस्थानी गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर पार्थ पवार हे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता पार्थ पवार यांच्या या भेटीमागे नेमकं काय कारण असेल, हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.
पार्थ दुपारी चार वाजता जेव्हा मातोश्री निवासस्थानी गेले, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. पार्थ यांचे स्वागत मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत यांनी केले. पार्थ सुमारे ३० मिनिटे वर्षा येथे होते. श्रीकांत शिंदे यांच्या निमंत्रणामुळे पार्थ पवार गणपतीच्या दर्शनाला आले होते, असे सांगितले जात आहे.
पार्थ पवार यांचे वडील अजित पवार यांनी भाजपबरोबर जात पहाटे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. सध्या अजित पवार विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे पार्थच्या वर्षावर जाण्याने चर्चा होत आहेत. पार्थ सध्य मावळ मतदारसंघातील गणेशोत्सव मंडळे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळत आहेत. मावळ लोकसभेची सुरुवात असणाऱ्या खारघरमधील शंभूराजे मित्रमंडळ, कामोठे येथील स्वराज्य प्रतिष्ठान आणि पनवेल येथील एकता मित्रमंडळासह जवळपास दहाबारा मंडळांत जाऊन त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
□ पार्थ पवारांच्या मनात काय ?
पार्थ पवार यांची ही भेट गणेशोत्सवानिमित्ताने होती त्यामागे कोणतेही राजकारण नाही असं सांगितलं जात असलं तरी यावरून राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडी सत्तेत असताना पार्थ पवार यांनी मांडलेली भूमिका व त्यानंतर शरद पवार यांनी त्यांची केलेली तिखट कानउघाडणी चर्चेचा विषय ठरली होती. शरद पवार यांच्या त्या तिखट कान उघाडणीनंतर पार्थ पवार साईड लाईन झाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता राज्यात सत्तांतर झालं असून पार्थ पवार कोणता वेगळा विचार तर करत नाहीयेत ना अशी चर्चा सुरु झाली आहे.