मोहोळ : सोलापूरच्या दयानंद कॉलेजमधील शिपायाने आपल्या गावी पाटकूल ( ता. मोहोळ) येथे राहत्या घरी अज्ञात कारणावरून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी (ता. 8) सकाळी उघडकीस आली आहे. A soldier of Dayanand College took the extreme step of writing a letter, he lost his life in Pandharpur
प्रतिक अनिल सवने (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतिक सवने हा दयानंद कॉलेज सोलापूर या ठिकाणी शिपाई म्हणून काम करित होता. त्याचे वडील भिमा सहकारी साखर कारखाना येथे हेल्पर म्हणून काम करतात. रात्री आई वडील यांचे सोबत प्रतिकने जेवण केले व रात्री साडेनऊ वाजणेच्या सुमारास तो त्याच्या खोलीत जाऊन झोपला.
आज गुरूवारी सकाळी सात वाजणेच्या सुमारास त्याच्या वडिलांनी त्याच्या दाराची कडी वाजवून त्यास उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून शेजारच्या लोकांना बोलावून दरवाजा तोडला असता प्रतिकने लुगीच्या साह्याने पाय बांधलेले व वरच्या सराला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. कंबरेला चिठ्ठी होती, त्यास तातडीने सोडवून मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेचा तपास पीएसआय लोबू चव्हाण करत आहेत.
□ विनयभंग प्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी
बारा वर्षीय मुलीचा घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी अति. जिल्हा न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी आरोपी तात्या उर्फ भरत पांडुरंग रोकडे (वय २४, रा. मोरवंची, ता. मोहोळ) याला तीन वर्षांची सक्त मजुरी आणि सात हजारांचा दंड सुनावला. यातील पाच हजार रुपये दंड पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एप्रिल, २०१९ मध्ये अल्पवीयन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून पिण्यासाठी पाणी मागण्याच्या कारणावरून घरामध्ये प्रवेश करून मुलीचा आरोपी तात्या रोकडे विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ रात्री 10 नंतरही डान्स स्पर्धा; गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
पंढरपूर – पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील गणेश मंडळांने रात्री दहा नंतर मोठमोठ्या आवाजाने ध्वनिक्षेप लावून डान्स स्पर्धा घेतल्या. या प्रकरणी मंडळाच्या आठ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोपळे येथील न्यू गोल्डन गणेश मंडळावर सदर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. याप्रकरणी रामेश्वर मारुती माने, श्रीकांत रामकृष्ण जाधव, सोमनाथ पोपट मुदगूल, आकाश अशोक मुदगूल, प्रशांत मारुती माने, महादेव कृष्णा भोसले, रामराज दत्तात्रय भोसले व हेमंत आजिनाथ जाधव या आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यू गोल्डन गणेश मंडळाने नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धा रात्री 10 पूर्वी संपविण्याची सूचना करण्यात आली असतानाही रात्री साडेदहा वाजेपर्यंत ध्वनीक्षेप चालू होता. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्यांनी स्पर्धा वेळेत न संपविल्यामुळे पोलीस नाईक नितीन माळी यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
□ पंढरपूर शहरात मुर्ती संकलनाचे 13 ठिकाणी केंद्र
– आपत्कालीन परस्थितीतीसाठी बोटीची व्यवस्था
पंढरपूर :- शहरातील घरघुतीसह सार्वजनिक मंडळाच्या मुर्ती गोळा करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने शहरात 13 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्राची उभारणी केली आहे. तसेच निर्माल्य गोळा करण्यासाठी फिरत्या वाहनांची व संकलन केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत चंद्रभागा नदीपात्रात बोटीची व जीवरक्षकांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.
गणेश विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण केली असून, विसर्जन ठिकाणी पुरेसा प्रकाश व्यवस्था, आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करण्यात आले आहे. नदीपात्रात होडीतून विसर्जन करताना क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींनी बसू नये. विसर्जनाच्या वेळी लहान मुलांना नदीपात्रापासून दूर ठेवावे. पावसामुळे घाटावरील पायऱ्या निसरड्या होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता घेवून सुरक्षित विसर्जन करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी माळी यांनी केले आहे.
● विसर्जनासाठी गणेशमूर्ती याठिकाणी जमा कराव्यात
अर्बन बँक प्रशासकीय इमारतीसमोर, भोसले चौक गणेश मंदिरासमोर, शेटे पेट्रोलपंपासमोर, कॉलेज चौक बस स्टॉप जवळ, ठाकरे चौक, सावरकर चौक गजानन मेडिकल समोर, शिवतीर्थ शिवाजी चौक, महात्मा फुले पुतळ्यासमोर, महाद्वार चौक पोलीस चौकी जवळ, मुक्ताबाई मठा समोर, अंबाबाई पटांगण समोर विठ्ठल मोबाईल शॉपी जवळ, यमाई तलाव गेट जवळ टाकळी रोड, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग जवळ या ठिकाणी घरघुतीसह सार्वजनिक मंडळाच्या मुर्ती गोळा करण्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत.