● घटनेला राजकीय वादाची किनार
जळगाव : राज्यभरात सर्वत्र गणेश विसर्जनाची धुम सुरु असतांना एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मिरवणूकीवरून मोठे वाद झाले आहेत. जळगाव शहरात गणपती विसर्जनाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
एका सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिक महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर हल्ला केला. कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या घरावर पेटते सुतळी बॉम्ब आणि दगड फेकले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरात मेहरून परिसरात महापौर जयश्री महाजन यांचं निवासस्थान आहे. महापौर जयश्री महाजन यांच्या घराजवळून एका सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक जात होती. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. गाड्यांची तोडफोड केली. घरात जयश्री महाजन घरी नव्हत्या त्यांचे सासरे होते ज्यांचे नुकतेच बायपास झाले आहे. महाजन यांच्या जाऊबाईंनी धुडगूस घालणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंता केली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. पोलिस तपास करत आहेत.
मेहरुण मधील ‘एक गाव एक गणपती’ व जय श्रीराम मित्र मंडळाची मिरवणूक जात असताना एक गाव एक गणपती मंडळाचे काही कार्यकर्ते जय श्रीराम मंडळाच्या मिरवणूक सहभागी झाले व त्यातील काही तरुणांनी महापौर जयश्री सुनील महाजन यांच्या घरासमोर गुलालाची उधळण करून त्यांच्या घरावर गुलाल व दगडफेक केली. यामुळे दोन गट समोरासमोर आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या घटनेला राजकीय वादाची किनार असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून मिरवणूक थांबवण्यात आली आहे. मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने महापौरांच्या घरासमोरच ही मिरवणूक थांबवण्यात आली आहे. या भागात तणाव निर्माण झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात किरकोळ अपवाद वगळता गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली असतानाच शहरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौरांच्या घरावर हल्ला केल्याचा प्रकार घडलाय. यामुळं या भागात मोठा तणाव पाहायला मिळाला. महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थान परिसरात गणपती स्थापन केला. गणपती मंडळाची मिरवणूक महापौर जयश्री महाजन यांच्या घरासमोरून जात असताना काही कार्यकर्त्यांनी महापौर जयश्री महाजन यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर गुलाल फेकल्याच त्यांच्या परिवारात लक्षात येताच परिवारातील महिला सदस्यांनी गुलाल उधळण्यास विरोध केला होता.
याच वेळी काही संतप्त कार्यकर्त्यांकडून महापौर महाजन यांच्या परिवारातील सदस्यांना मारहाण करण्यात आल्याचा आणि घरावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप जयश्री महाजन यांनी केलाय. या घटनेत पोलीस प्रशासनानं बंदोबस्ताकडं दुर्लक्ष केल्यानं हा हल्ला झाला असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
□ मंत्री गिरीश महाजनांवरही रोष
मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. जळगाव शहरातील गणेश मंडळ विसर्जन मिरवणूक दुपारी सुरू झाली होती. मात्र गिरीश महाजन यांचे कार्यकर्ते एकाच जागी ते नाचत राहिल्याने एक ते दीड तास ही मिरवणूक एकाच ठिकाणी ताटकळत उभी होती.
त्यामुळे इतर मंडळातील कार्यकर्त्यामध्ये रोष असल्याचं दिसून आलं. एक तास मिरवणूक खोळंबल्यानंतरही नाशिकहून परतलेले गिरीश महाजन गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. त्यावेळीही अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना आपल्या मंडळात आपल्या सोबत नाचण्यासाठी आग्रह करीत होते. त्यामुळेही अनेक मंडळाचे कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. मिरवणुकीत रोष निर्माण झाला होता.