पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेचा आत्मा असून ते कधीही पराभूत होणार नाहीत, असा विश्वास राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केला. ते पंढरपूरला श्री विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. Narendra Modi can never be defeated; Labor Minister Suresh Khade’s statement in Pandharpur
मंत्री खाडे म्हणाले, मोदी हे जनतेचा आत्मा आहेत. त्यांना जगभरातून पाठिंबा आहे. अशी व्यक्ती कधीची पराभूत होवू शकत नाही. तत्पूर्वी खाडे यांना बारामती लोकसभेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
बारामतीसाठी भाजपा जंगजंग पछाडत आहे, यात त्यांना यश येईल का, असा प्रश्न विचारला असता सुरेश खाडे म्हणाले, यापूर्वी अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, इंदिरा गांधी यांना ही पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ भाजपा जिंकू शकेल, असे त्यांनी सूचित केले.
मंत्री खाडे यांनी आज विठ्ठल – रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, शंकुतला नडगिरे यांच्याहस्ते शाल, श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळेस आमदार समाधान आवातडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, भाजपाचे विक्रम शिरसट, माउली हळणवर उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ Solapur city l महावितरण कर्मचा-याचा विसर्जना दरम्यान विहिरीत बुडून मृत्यू
सोलापूर : वीज महामंडळ म्हणजेच महावितरण मध्ये तंत्रज्ञ या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा श्री गणेश विसर्जनादरम्यान विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना विमानतळ परिसरातील हत्तुरे वस्ती येथे घडलीय.
विजय भीमाशंकर पनशेट्टी (वय 32 वर्ष, रा, हतुरे वस्ती, सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने हतुरे वस्ती परिसरात शोककळा पसरली आहे. मयत विजय पनशेट्टीला चार वर्षांचा मुलगा आहे. दोन वर्षांपूर्वी विजयच्या पत्नीने देखील आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.
आपल्या आई वडिलांसोबत विजय आपल्या चार वर्षीय मुलाचा सांभाळ करत होता. महावितरणमध्ये ड्युटी करत मुलाचा सांभाळ करत असल्याचे पाहून आजूबाजूचे शेजारी विजयचं कौतुक करत होते. पण आता विजय पनशेट्टी गणेश विसर्जनादरम्यान मृत झाल्याने चार वर्षीय मुलाचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न पडला आहे. त्यामुळेच हळहळ व्यक्त होत आहे.
सोलापूर शहरातील हतुरे वस्ती येथे विजय पटशेट्टीने आपल्या मित्रांसोबत विश्वविनायक हरी ओम गणेश मंडळ स्थापन केले होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचे निर्बंध असल्याने गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. यंदा मात्र सर्व निर्बंध शिथिल झाल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता.
विजय हा या गणेश मंडळाचा अध्यक्ष होता. 9 सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास टिकेकरवाडी येथील एका विहिरीत विजय आपल्या मंडळासोबत मिरवणूक काढत गणेश विसर्जनासाठी गेला होता. गणेश मूर्ती घेऊन विहिरीत गेला आणि मूर्तीसोबत विजय देखील बुडाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात आला पण विजय पनशेट्टी सापडला नाही. आज शनिवारी पहाटेच्या सुमारास जीवरक्षक व पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आले.