पंढरपूर शहर आणि तालुक्याला पुराचा धोका

0
1

 

पंढरपूर : पुणे जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पाऊस सुरू आहे भीमा खोऱ्यात आणि उजनी जलाशयावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे उजनी धरणात येणारी आवक मोठ्या प्रमाणावर येत आहे त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये 90 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे तर वीर धरणातून 43 हजार क्युसेक्स पाणी नीरा नदीत सोडण्यात येत आहे त्यामुळे पंढरपूरला पुराचा धोका निर्माण झाला आहे. Flood threat to Pandharpur city and taluk Bhima Neera River Cusack Discharge

उजनी धरणातून आज शुक्रवारी सायंकाळी 90 हजार क्युसेकने पाणी सोडले जात होते. वीज निर्मितीसह हा विसर्ग 91 हजार 600 क्युसेकचा इतका होता. तर निरा नदीवरील वीरमधून 43 हजार क्युसेकने पाणी सोडले जात होते. या दोन्ही धरणांमधून मिळून जवळपास 1 लाख 34 हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. पावसाच्या प्रमाणात हे विसर्ग कमी जास्त होवू शकतात. दरम्यान उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सकाळपासून झपाट्याने वाढविले गेले आहेत.

भीमा खोर्‍यात पावसाचा जोर असून पुणे परिसरात पर्जन्यराजा जोरदार बरसत असल्याने खडकवासला धरणातून 30 हजार तर मुळशीतून 26 हजार यासह चासकमान प्रकल्पातून 9 हजार, घोडमधून 11 हजार व अन्य धरणांमधूनही पाणी सोडले जात होते. यामुळे उजनीची आवक ही येत्या काही तासात वाढणार आहे. उजनी धरण हे सकाळी 108 टक्के उपयुक्त पातळीत भरले होते. यात आता पाणी साठवण करण्यासाठी जागा नसल्याने वरील धरणांमधून विसर्ग वाढताच उजनीतूनही मोठ्या प्रमाणात भीमा नदीत पाणी सोडले जात आहे.

निरा खोर्‍यातील सर्वच धरणांवर पावसाचा जोर कायम असून तेथील सर्व प्रकल्प क्षमतेने भरले आहेत. 48 टीएमसीहून अधिक तेथे पाणीसाठा असल्याने वीर चे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सायंकाळी पाच वाजता 43 हजार क्युसेकचा विसर्ग सोडला जात होता. भाटघर व देवघर धरणातून पाणी सोडले जात असून ते वीरमध्ये येते व हा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे.

आता उजनी व वीरच्या पाण्याने निरा व भीमा नदी दुथडी भरून वाहात आहेत. नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नृसिंहपूर संगमच्या पुढे सोलापूर जिल्ह्यात भीमा आता पूरसदृश्य स्थितीत वाहण्यास सुरूवात होणार आहे. जवळपास सव्वा लाखाच्या आसपास विसर्ग नदीत मिळण्याची शक्यता आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरू शकते. सध्या भीमाकाठच्या शेतकर्‍यांचे लक्ष उजनी व वीरच्या विसर्गांकडे आहेे. पंढरपूरमध्ये ही नदीकाठी असणार्‍या वसाहतींमध्ये एक लाख दहा हजार क्युसेकचा विसर्ग मिळाल्यास पाणी शिरते. हे पाहता नगरपरिषद व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या वसाहतींमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यास सुरूवात केली आहे.

 

भीमाकाठी अतिदक्षता सध्या उजनी व वीरमधून सोडण्यात येणार्‍या पाण्यात सतत वाढ होत असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. भीमेला पूरसदृश्य स्थिती निर्माण होणार असल्याने पंढरपूरसारखी शहर व सखल भागात जास्त खबरदारी घेतली जात आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंढरपूरमध्ये प्रशासनाने खबरदारीच्या उपाय योजना आखल्या आहेत. संभाव्य पाणी येवू शकणार्‍या वसाहती रिकाम्या केल्या जात आहेत. यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी व अधिकारी काम करत आहेत.

 

 

□ बोगस करार केल्याप्रकरणी महापालिकेचे दोन कर्मचारी निलंबित

● तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश

 

सोलापूर : नॉर्थकोट मैदानाच्या बाजूस असलेल्या इंडो तिबेटियन वुलन मार्केट असोसिएशनला जागा देण्यासाठी बोगस करार पत्र करून परस्पर जागेची कब्जा पावती दिल्याप्रकरणी महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी निलंबित केले आहे. तसेच यातील. दोषी असलेल्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांना दिले असून तिघांची विभागीय चौकशी देखील केली जाणार आहे.

 

इंडो तिबेटियन वुलन मार्केट असोसिएशनला जागा देण्यासाठी बोगस करार पत्र करून परस्पर जागेची कब्जा पावती दिल्याची बाब मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी महापालिकेचे वरिष्ठ मुख्य लेखनिक बी. बी नरोटे, भूमापक राजकुमार कावळे व स्वेच्छा निवृत्ती घेतलेले आर. के. शेरदी या तिघांनी मिळून हा प्रकार केला असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बी. बी. नरोटे व राजकुमार कावळे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर या तिघांचीही विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.

 

 

इंडो तिबेटियन वुलन  मार्केट असोसिएशनला तेथील जागा मुदतवाढ द्यावयाची होती. मात्र महापालिकेच्या तिघा कर्मचाऱ्यांनी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त व आयुक्त यांना कोणतीही माहिती व सूचना न देताच मुदतवाढीचा करार परस्पर केला तसेच दहा वर्ष मुदतीवर जागा देण्याची कब्जा पावतीही दिली. ही बाब प्राथमिक चौकशीमध्ये पुढे आली आहे. यानंतर आयुक्तांनी नरोटे आणि कावळे या दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे नवनवीन कृत्य उघड होत आहे. काही ठिकाणी दप्तर गायब झाले आहेत. तर आता बोगस कागदपत्र देखील तयार होत असल्याची बाब पुढे येत आहे.

 

□ महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण

सोलापूर : महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाची ३३ वी वार्षिक सभा यंदा रविवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता गुजराती भवन येथे होणार असल्याची माहिती सोलापूर गुजराती मित्र मंडळाचे अध्यक्ष मुकेश मेहता यांनी दिली.

 

या अधिवेशनात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमधील पदाधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान, महामंडळाच्यावतीने देण्यात येणाऱ्या भारत व महाराष्ट्र गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या पुरस्कारांचे वितरण वार्षिक सभेच्या दिवशीच सायंकाळी चार वाजता केले जाणार आहे.

 

यंदाचा भारत गौरव पुरस्कार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना तर केशव रांभिया, विजय पटेल, नयन जोशी, डॉ. राजीव प्रधान व किशोर चंडक यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पारेख यांनी दिली.