□ महापालिका आयुक्तांचे आवाहन !
□ 1632 चौरस मीटर इतकी कमर्शियल जागा गॅलोर कंपनीने महापालिकेला देण्याचे दिले आदेश !
सोलापूर : विजापूर रोडवरील बहुचर्चित पनाश टॉवर नवव्या मजल्यावरील खरेदी नागरिकांनी करू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे. त्याचबरोबर 1632 चौरस मीटर इतकी कमर्शियल वापरातील पुढील बाजूची जागा गॅलोर कंपनीने महापालिकेला द्यावी, असे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. Panash Tower : Citizens should not shop on the ninth floor. Municipal commissioner appeals to buy and sell
नियोजित तब्बल १७ मजली पनाश टॉवर बांधकाम प्रकरणी पुण्यातील गॅलोर कंपनीला महापालिका प्रशासनाच्या वतीने बजावलेल्या नोटीसीच्या खुलाशावर शासनाचे मार्गदर्शन महापालिका आयुक्तांनी मागविले आहे. या टॉवरमध्ये कंपनीकडून वाढीव एफएसआय प्रमाणे वाढीव हिस्साही महापालिकेने घेतला पाहिजे का ? यासह इतर मुद्द्यांसंदर्भात प्रामुख्याने मार्गदर्शन मागवण्यात आले आहे, असे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी स्पष्ट केले आहे.
पनाश टॉवर मधील नवव्या मजल्यावरील फ्लॅट खरेदी नागरिकांनी करू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त यांनी केला आहे. दरम्यान, पनाश टॉवर बांधकाम प्रकरणी राज्य शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात येत आहे. त्यामुळे नवव्या मजल्यावरील खरेदी तूर्तास थांबविण्यात यावी या संदर्भात ही तातडीने महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे.
दरम्यान, या टॉवरमधील 1632 चौरस मीटर इतकी कमर्शियल वापरातील पुढील बाजूची जागा गॅलोर कंपनीने महापालिकेला द्यावी असे आदेशही महापालिका आयुक्तांनी गॅलोर कंपनीला दिले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ पनाश टॉवर : खरेदी विक्री व्यवहार स्थगितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार !
विजापूर रोडवरील बहुचर्चित पनाश टॉवर येथील खरेदी-विक्री व्यवहार स्थगित करण्यासंदर्भात सोलापूर जिल्हाधिकारी यांना पत्र देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.
शहरातील विजापूर रोडवरील बहुचर्चित पनाश टॉवर येथील खरेदी-विक्री व्यवहार स्थगित करण्यासंदर्भात महापालिकेने मुद्रांक जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंदर्भात मुद्रांक जिल्हाधिकारी यांना आदेश द्यावे लागतात. त्यामुळे स्थगिती बाबतचे पत्र महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी यांना द्यावे. त्यानंतरच त्याप्रमाणे कार्यवाही करता येईल, असे मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महापालिका आता जिल्हाधिकारी यांना या संदर्भात पत्र देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.
नियोजित तब्बल १७ मजली पनाश टॉवर बांधकाम प्रकरणी पुण्यातील गॅलोर कंपनीला महापालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त पी. शिवशंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. या नोटीसीचे उत्तर वजा खुलासा या कंपनीने सोलापूर महापालिकेला दिला.
दरम्यान, सोलापूर महापालिकेचे नगररचना विभागाचे (एडीटीपी) संचालक संभाजी कांबळे यांनी त्यावर अभ्यास करण्यासाठी दोन दिवसाचा अवधी मागितला होता. त्यानंतर राज्य शासनाचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान आता या टॉवर मधील खरेदी विक्री व्यवहार स्थगिती संदर्भात जिल्हाधिकारी यांना पत्र देणार असल्याचे महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी सांगितले.