Tuesday, January 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मोदीजी सुट्टी घ्या अन् वाढदिवस साजरा करा – शाहरूख खानसह अनेक सेलेब्रिटीजने दिल्या शुभेच्छा

Modi ji take a holiday and celebrate your birthday - Wishes from many celebrities including Shah Rukh Khan

Surajya Digital by Surajya Digital
September 17, 2022
in Hot News, टॉलीवुड, देश - विदेश
0
मोदीजी सुट्टी घ्या अन् वाढदिवस साजरा करा – शाहरूख खानसह अनेक सेलेब्रिटीजने दिल्या शुभेच्छा
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त अनेकजण मोदींना शुभेच्छा देत आहेत. अभिनेता शाहरूख खाननेही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘देश आणि देशवासियांच्या कल्याणाप्रती असलेला तुमचा सेवाभाव कौतुकास्पद आहे. तुमची ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला शक्ती आणि आरोग्य लाभो. सर, आता एक दिवस सुट्टी घ्या आणि तुमचा वाढदिवस साजरा करा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’, असं शाहरूखने म्हटलं. Modi ji take a holiday and celebrate your birthday – Wishes from many celebrities including Shah Rukh Khan

 

महाराष्ट्रात मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ चे आयोजन केले आहे. या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिले. या पंधरवड्याच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.

 

आजच्या खास दिवसानिमित्त सर्वजण पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत आहेत. या यादीत बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगण, कंगना रणौत, आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी, अनिल कपूर, कैलाश खेर,सोनू सूद, अभिषेक बच्चन, सनी देओल आणि अनुपम खेरपर्यंत अनेक बॉलिवूड दिग्गजांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत.

 

पंतप्रधान मोदी यांचे मंत्रिमंडळातील सहकारी नितीन गडकरी, राजनाथ सिंह, स्मृती इराणी यांनी वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. कू प्लॅटफॉर्मवर #hbdmodiji हा हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये आला असून याचा वापर करत सर्वसामान्य नागरीकही त्यांना शुभेच्छा देत आहेत.

 

भारतीय क्रिकेटसंघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना तुम्हाला आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

शाहरुख खानच्या पोस्टप्रमाणे अजय देवगणनेही आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘माननीय पंतप्रधान, तुमचे नेतृत्व मला आणि इतर अनेकांना प्रेरणा देते. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि येणार्‍या वर्षासाठी शुभेच्छा सर.’ या पोस्टसोबत अजयने पंतप्रधानांसोबतचा स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे.

 

शाहरुख खानने खास पद्धतीने पंतप्रधान मोदींना शुभेच्या देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांचे कौतुक केले आहे. किंग खानने ट्विटमध्ये लिहिले की, ‘आपल्या देशाच्या आणि लोकांच्या कल्याणासाठी तुमचे समर्पण अत्यंत प्रशंसनीय आहे. तुमची सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्हाला शक्ती आणि आरोग्य मिळो. एक दिवस सुट्टी घ्या आणि आपल्या वाढदिवसाचा आनंद घ्या, सर. वाढदिवसाच्या शुभेच्छा.’

 

आदरणीय प्रधानमंत्री @narendramodi जी। आज आपसे मिलकर मन अत्यंत प्रसन्न हुआ।आप देशवासियों के लिए दिन रात जो मेहनत कर रहें है, वो प्रेरणात्मक है! जिस श्रद्धा के साथ आपने मेरी माँ द्वारा आपकी रक्षा के लिए भेजी रुद्राक्ष की माला स्वीकार की वो हम हमेशा याद रखेंगे।जय हो।जय हिंद! 🙏🇮🇳🙏 pic.twitter.com/yBQN4UOvWy

— Anupam Kher (@AnupamPKher) April 23, 2022

अनुपम खेर यांनी नरेंद्र मोदींचा व्हिडिओ शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, ‘आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो. तुमची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहात आणि वर्षानुवर्षे ते करत राहाल. तुमच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद.

 

अभिनेत्री आलिया भट्टने पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले की, आदरणीय पंतप्रधान तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आयुष्यभर प्रेरणादायी नेतृत्वासाठी शुभेच्छा देतो.

पंतप्रधानांना शुभेच्या देताना अभिषेक बच्चन यांनी लिहिले, ‘आमच्या माननीय पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. अनिल कपूरने ट्विटरवर पीएम मोदींसोबतचे दोन फोटो शेअर करून त्यांना शुभेच्या दिल्या आहेत. त्यासोबत लिहिले आहे की, ‘ज्या व्यक्तीने भारताला जगाच्या नकाशावर इतक्या उंचीवर नेले आहे, की ज्याची आपण कल्पनाही केली नसेल, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या गौरवशाली राष्ट्राचे नेते. तुम्ही दीर्घायुष्य आणि निरोगी राहा.

Tags: #Modi #holiday #celebrate #birthday #Wishes #celebrities #including #ShahRukhKhan#मोदी #सुट्टी #वाढदिवस #साजरा #शाहरूखखान #सेलेब्रिटीज #शुभेच्छा
Previous Post

आम्ही पुढच्या दोन वर्षात गुजरातला मागे टाकू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

Next Post

चंद्रभागा नदीपात्रातील कुटुंबांचे स्थलांतर; पंढरपुरातून वाहतोय 93 हजार क्युसेकचा विसर्ग

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
चंद्रभागा नदीपात्रातील कुटुंबांचे स्थलांतर; पंढरपुरातून वाहतोय 93 हजार क्युसेकचा विसर्ग

चंद्रभागा नदीपात्रातील कुटुंबांचे स्थलांतर; पंढरपुरातून वाहतोय 93 हजार क्युसेकचा विसर्ग

वार्ता संग्रह

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
« Aug   Oct »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697