Wednesday, February 8, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मला यशवंतराव आणि तुम्हाला दादा – मामा मिळाले; कुर्डूवाडीत शरद पवारांकडून शिंदेबंधूंचे कौतुक

I got Yashwantrao and you got Dada-Mama; In Kurduwadi, Sharad Pawar unveiled a full-length statue in praise of the Shinde brothers

Surajya Digital by Surajya Digital
September 19, 2022
in Hot News, सोलापूर
0
मला यशवंतराव आणि तुम्हाला दादा – मामा मिळाले; कुर्डूवाडीत शरद पवारांकडून शिंदेबंधूंचे कौतुक
0
SHARES
315
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ स्व. विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न

 

कुर्डूवाडी : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज कुर्डूवाडी दौ-यावर होते. त्यांच्या हस्ते आज स्वर्गीय स्व. विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले. यावेळेस त्यांनी मला यशवंतराव आणि तुम्हाला बबनदादा – संजयमामा मिळाल्याचे गौरवोद्गार काढले. I got Yashwantrao and you got Dada-Mama; In Kurduwadi, Sharad Pawar unveiled a full-length statue in praise of the Shinde brothers

 

माढा तालुक्याचे पहिले आमदार व तालुका पंचायतचे सभापती माजी आमदार कै. विठ्ठलराव शिंदे यांनी माढा तालुक्यात साखर कारखाना सुरू करण्याचे स्वप्न पाहिले होते‌. ते त्यांच्या हातून अर्धवट राहिले, भाऊंचे स्वप्न त्यांचे चिरंजीव आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे यांनी पूर्ण केले. आज देशांमध्ये माढा तालुका आणि त्यांचा कारखाना हा ऊस उत्पादनामध्ये गाळपमध्ये देशात एक नंबरला असल्याने त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. मला यशवंतराव चव्हाण यांसारखे व्यक्तिमत्त्व मिळालं तर तुम्हाला दादा आणि मामा सारखे व्यक्तिमत्व मिळालं, बबनदादा – संजयमामा या दोघांनी माढा करमाळा तालुके सुजलम सुफलम केले. येणाऱ्या काळात जिल्हा देखील सुजलम सुफलाम करतील असा विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आमदार शिंदे कुटुंबाचे कौतुक केले.

 

माजी आमदार विठ्ठलराव शिंदे यांच्या पुण्यतिथी निमित्त तालुका पंचायत समिती कार्यालय कुर्डूवाडी येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज झाले. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार अरुण लाड, माजी आमदार विनायकराव पाटील , राजन पाटील, साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, कल्याणराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील, माजी महापौर मनोहर सपाटे, दिलीप काेल्हे, सुरेश हसापुरे, विश्वास बारबोले, निरंजन भूमकर, आप्पासाहेब झांजुरणे, सुभाष गुळवे यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित हाेती.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

पुढे बोलताना पवार म्हणाले, विठ्ठलराव शिंदे यांचा पुतळा समाजकारणासाठी एक आदर्श मानला जाईल, देशातील शेवटच्या घटकापर्यंत जर लाभ पोहोचवला जात नसेल आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत असेल तर हे राजकारण काही कामाचे नाही, असे सांगताना पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसा दिवशी एका शेतकऱ्याने त्यांना पत्र पाठवून शुभेच्छा देऊन आत्महत्या केल्याचे भाषणात त्यांनी आवर्जून सांगितले.

 

□ अपक्ष असून देखील संजयमामा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर एकनिष्ठ राहिले

 

४० – ४५ जण एकत्र येतात सुरतला रात्री जातात … सुरत वरुन गुवाहाटीला जातात … गुवाहाटीवरनं गोव्याला येतात… आणि गोव्यातून महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथ घ्यायला एक महिना लावतात, मंत्रिमंडळ स्थापन करायला 42 दिवस लावतात, अजून जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या निवडी नाहीत या महाराष्ट्रामध्ये चाललय काय ? जे गेले ते गेले… त्यांना लखलाभ… पक्ष आमदार सुद्धा गेले होते त्यांच्याकडे पण माढा आणि करमाळा तालुका इतका स्वाभिमानी तालुका आहे की अपक्ष आमदार असून देखील संजयमामा शिंदे त्यांच्या गळाला लागले नाहीत… हा संजय मामांचा स्वाभिमानी बाणा तो आपण सगळ्यांनी जपला पाहिजे , असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

 

□ …आ. बबनदादांच्या डोळ्यात पाणी येताच जनसमुदाय झाला भाऊक

 

विठ्ठलराव शिंदे यांच्यापासून अगदी भिसे मालक, गणपतराव साठे , यांच्यापासून असा अनेक नेत्यांची यादी लागेल की ज्यांनी शिंदे कुटुंबावरती भरभरून प्रेम केलं , करमाळ्यामध्ये कोणतीही ओळख नसताना संजय मामाला आमदार केलं, शेतकऱ्यांनी सभासदांनी भरभरून प्रेम केलं, मोठा विश्वास व्यक्त केला. पवार साहेबांनी देखील कोणत्याही गोष्टीत कमी केले नाही. आणि शिंदे कुटुंब तुम्ही केलेल्या प्रेमाला कधीच विसरू शकणार नाही. पवार साहेबांनी केलेल्या उपकाराला कधीच विसरू शकणार नाही… असे म्हणताच भाषण सुरू असतानाच आमदार बबनदादा शिंदे यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले… आणि अश्रु पुसत विचारपीठावरती बसले. यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांच्या देखील डोळ्यांमध्ये अश्रू तरळल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी पाहिले.

 

 

Tags: #Yashwantrao #got #Dada #Mama #Kurduwadi #SharadPawar #unveiled #full-length #statue #praise #Shinde #brothers#यशवंतराव #कुर्डूवाडी #दादा #मामा #शरदपवार #शिंदेबंधू #कौतुक #पूर्णाकृती #पुतळा #अनावरण
Previous Post

‘धमकीनंतरही ‘पाॅवर’ बाज शरद पवारांची कुर्डूवाडी सफर जोषात !

Next Post

पंढरपुरात रामदास कदम, शहाजीबापूंच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पंढरपुरात रामदास कदम, शहाजीबापूंच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन

पंढरपुरात रामदास कदम, शहाजीबापूंच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन

वार्ता संग्रह

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
« Aug   Oct »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697