□ रश्मी ठाकरे,आदित्य ठाकरे यांच्यावरील टीकेचे संतप्त पडसाद
सोलापूर : शिंदे गट समर्थक रामदास कदम यांनी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचे संतप्त पडसाद पंढरपुरात उमटले. रामदास कदम, आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रतिमेस जोडोमारो आंदोलन झाले. In Pandharpur, Ramdas Kadam, Shahaji Bapu’s image is attached to the movement
एकनाथ शिंदे समर्थक माजी आमदार रामदास कदम आणि आमदार शहाजी पाटील हे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका करीत आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे व्यक्तव्य करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
नुकतेच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे जातील तिथे रश्मी ठाकरे असतात असे उद्गार काढत समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे, असा आरोप करीत त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज पंढपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना ठाकरे गटाकडून रामदास कदम आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, जिल्हा उपप्रमुख सुधीर अभंगराव, शहर प्रमुख रवी मुळे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख ऍड. पूनम अभंगराव, शिवसेना उपशहर प्रमुख तानाजी मोरे, सचिन बनपट्टे, विनायक वनारे, अविनाश वाळके, बाबा आभंगराव, ईश्वर साळुंखे सुरज गायकवाड ,मारू धोत्रे,प्रदीप धोत्रे,मारू शिंगाडे, महिला आघाडीच्या सुनीता माने,मंजुळा दौंडमिशे, संगीता पवार, रवीना पठाण यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.