Friday, January 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मटणाचे तुकडे कुत्र्याने पळवल्याने गोळीबार; मुलीचा मृत्यू, आई – वडिलावर गुन्हा दाखल

Shots fired by dogs running away with pieces of mutton; Girl's death, case registered against parents, Solapur Naldurg Karla

Surajya Digital by Surajya Digital
September 20, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
मटणाचे तुकडे कुत्र्याने पळवल्याने गोळीबार; मुलीचा मृत्यू, आई – वडिलावर गुन्हा दाखल
0
SHARES
201
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : रविवार सुटीचा दिवस म्हणून घरात मटणाचा स्वयंपाक केला. जावई, मुलगी, नातू , वडील आणि आई यांनीही यावर मनसोक्त ताव मारला. परंतु जेवणानंतर उरलेले मटणाचे चार घास कुत्र्याने फस्त केले. याचा राग अनावर होऊन पित्याने पोटच्या मुलीवर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना नळदुर्ग येथील कार्ला येथ घडली. Shots fired by dogs running away with pieces of mutton; Girl’s death, case registered against parents, Solapur Naldurg Karla

याप्रकरणी बाप आणि आई या दोघांविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काजोल मनोज शिंदे ( वय 20 , रा कार्ला, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर गणेश झप्पन भोसले (५०, रा. कार्ला, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे बापाचे नाव आहे. काजोलला पुढील उपचारांसाठी उस्मानाबादवरून सोलापूरला नेण्यात आले होते. पण उपयोग झाला नाही. तिचा सोलापुरात मृत्यू झाला.

लग्नानंतर काजोल पती मनोज, दोन वर्षाचा मुलगा आणि दोन महिन्यांची मुलगी असे माहेरच्या घराशेजारीच पत्र्याचे शेडमध्ये राहत होती. परंतु माहेर आणि सासरचा स्वयंपाक मात्र एकत्र होत होता. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने घरात मटणाचा बेत केला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास सर्वांची एकत्र पंगत बसली. जेवताना इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. मटणाचे जेवण असल्याने कुत्र्यांचीही गर्दी तेथे जमली होती. जेवणानंतर वडील गणेश हा घरात गेला. तर आई मीराबाई तिथेच काही तरी काम करीत होत्या.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

सर्वांच्या जेवणानंतर मटण भांड्यात शिल्लक राहिले होते. कुत्र्याने ते पळविले. यावरून आई मीराबाई आणि काजोल यांच्यात वाद झाला. या वादात वडील गणेशही पडले. त्यावेळी आमच्या इथेच राहते, आमचेच खाते आणि आम्हाला बोलते का, म्हणून खवळलेल्या आई मीराबाईने घरातील गावठी कट्टा नवरा गणेशच्या हातात आणून दिला. दुसऱ्याच क्षणी मागचा पुढचा विचार न करता, वडील गणेश याने गावठी कट्ट्यातून मुलीवर गोळी झाडली.

 

काजोलचा आवाज ऐकून तिथेच परिसरात असलेला पती मनोज धावत आला. तातडीने त्यांनी काजोलला उपचारासाठी प्रथम नळदुर्ग नंतर उस्मानाबाद येथील रुग्णालयात हलविले. काजोल रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तातडीने पतीने जखमी काजलला नळदुर्ग नंतर उस्मानाबाद येथील रुग्णालयात हलविले. उपचारापूर्वीच काजोलचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन सोलापूर येथील शासकीय रुणालयात करण्यात आले.

□ तुळजापुरात पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

 

काजोलवर गोळीबार केल्यानंतर तिच्या पतीने तिला रुग्णालयात नेले. त्यानंतर वडील फरार झाला. काजोलला पुढील उपचारांसाठी उस्मानाबादवरून सोलापूरला नेण्यात आले होते. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.  काल सोमवारी (ता. 19) काजोलच्या मृतदेहावर तुळजापूर येथे पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, गणेश भोसले फरार झाल्यामुळे पोलिसांना त्याने गावठी कट्टा कोठून आणला, याबद्दलची माहिती उपलब्ध झालेली नाही.

Tags: #Shots #fired #bydogs #running #pieces #mutton #Girl's #death #case #registered #parents #Solapur #Naldurg #Karla#मटण #तुकडे #कुत्रा #पळवल्याने #गोळीबार #मुली #मृत्यू #सोलापूर #नळदुर्ग #कार्ला #आई #वडिल #गुन्हा #दाखल
Previous Post

पंढरपुरात रामदास कदम, शहाजीबापूंच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन

Next Post

मराठा आरक्षण : शिंदे सरकारची 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
मराठा आरक्षण : शिंदे सरकारची 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

मराठा आरक्षण : शिंदे सरकारची 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

वार्ता संग्रह

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
« Aug   Oct »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697