सोलापूर : रविवार सुटीचा दिवस म्हणून घरात मटणाचा स्वयंपाक केला. जावई, मुलगी, नातू , वडील आणि आई यांनीही यावर मनसोक्त ताव मारला. परंतु जेवणानंतर उरलेले मटणाचे चार घास कुत्र्याने फस्त केले. याचा राग अनावर होऊन पित्याने पोटच्या मुलीवर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना नळदुर्ग येथील कार्ला येथ घडली. Shots fired by dogs running away with pieces of mutton; Girl’s death, case registered against parents, Solapur Naldurg Karla
याप्रकरणी बाप आणि आई या दोघांविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काजोल मनोज शिंदे ( वय 20 , रा कार्ला, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर गणेश झप्पन भोसले (५०, रा. कार्ला, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे बापाचे नाव आहे. काजोलला पुढील उपचारांसाठी उस्मानाबादवरून सोलापूरला नेण्यात आले होते. पण उपयोग झाला नाही. तिचा सोलापुरात मृत्यू झाला.
लग्नानंतर काजोल पती मनोज, दोन वर्षाचा मुलगा आणि दोन महिन्यांची मुलगी असे माहेरच्या घराशेजारीच पत्र्याचे शेडमध्ये राहत होती. परंतु माहेर आणि सासरचा स्वयंपाक मात्र एकत्र होत होता. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने घरात मटणाचा बेत केला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास सर्वांची एकत्र पंगत बसली. जेवताना इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. मटणाचे जेवण असल्याने कुत्र्यांचीही गर्दी तेथे जमली होती. जेवणानंतर वडील गणेश हा घरात गेला. तर आई मीराबाई तिथेच काही तरी काम करीत होत्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सर्वांच्या जेवणानंतर मटण भांड्यात शिल्लक राहिले होते. कुत्र्याने ते पळविले. यावरून आई मीराबाई आणि काजोल यांच्यात वाद झाला. या वादात वडील गणेशही पडले. त्यावेळी आमच्या इथेच राहते, आमचेच खाते आणि आम्हाला बोलते का, म्हणून खवळलेल्या आई मीराबाईने घरातील गावठी कट्टा नवरा गणेशच्या हातात आणून दिला. दुसऱ्याच क्षणी मागचा पुढचा विचार न करता, वडील गणेश याने गावठी कट्ट्यातून मुलीवर गोळी झाडली.
काजोलचा आवाज ऐकून तिथेच परिसरात असलेला पती मनोज धावत आला. तातडीने त्यांनी काजोलला उपचारासाठी प्रथम नळदुर्ग नंतर उस्मानाबाद येथील रुग्णालयात हलविले. काजोल रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तातडीने पतीने जखमी काजलला नळदुर्ग नंतर उस्मानाबाद येथील रुग्णालयात हलविले. उपचारापूर्वीच काजोलचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन सोलापूर येथील शासकीय रुणालयात करण्यात आले.
□ तुळजापुरात पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
काजोलवर गोळीबार केल्यानंतर तिच्या पतीने तिला रुग्णालयात नेले. त्यानंतर वडील फरार झाला. काजोलला पुढील उपचारांसाठी उस्मानाबादवरून सोलापूरला नेण्यात आले होते. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. काल सोमवारी (ता. 19) काजोलच्या मृतदेहावर तुळजापूर येथे पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, गणेश भोसले फरार झाल्यामुळे पोलिसांना त्याने गावठी कट्टा कोठून आणला, याबद्दलची माहिती उपलब्ध झालेली नाही.