□ प्रथमेश म्हेत्रे : दुधनीच्या शाश्वत विकासातील उमलते युवा नेतृत्व
□ जनतेच्या अपेक्षा वाढल्या
Dudhani Akkalkot, the third generation of the Prathamesh Mhetre Mhetre family, is active in politics
अक्कलकोट/ रविकांत धनशेट्टी
गेल्या वीस महिन्यांपूर्वी सर्व संचालक मंडळानी एकमताने कौल देवून अक्कलकोट तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी उमदे, उमलते युवा नेतृत्व, युवकांचे आयडॉल, आयकॉन प्रथमेश शंकरराव म्हेत्रे यांची बिनविरोध निवड करून दुधनीच्या शाश्वत विकासावर मोहोर उमटविली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
प्रथमेश म्हेत्रे हे शांत, सयंमी स्वभावाचे व सुसंस्कारीत, उच्च शिक्षित युवा नेतृत्व आहे. त्यांचे शिक्षण बी. टेक. (मेकॅनिक ) हे भारत सरकारच्या अधिकृत असलेल्या नामांकित मंगळूर अभियांत्रीकी महाविद्यालयात पूर्ण झाले आहे. मंगळूर कर्नाटकातून त्यांनी ही पदवी विशेष नैपुण्यासह संपादन केली आहे. त्यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण सांगलीच्या एनआयटी सरकारी महाविद्यालयातून झाले. गुणवत्तापूर्ण शिक्षण बरोबरच त्यांना क्रीडा क्षेत्रात देखील विशेष रस आहे. ते स्वतः बॅडमिंटन राष्ट्रीय खेळाडू आहेत. शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रासह ते समाजकारणात राजकारणात सुद्धा सक्रिय झाले आहेत.
शाश्वत विकासाचे ध्येय बाळगून सतत कार्यमग्न राहाणे हा त्यांचा गुण विशेष आहे. त्यामुळेच या अगोदर त्यांची दुधनी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाली. सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणाचे अनेक कामे मार्गी लावली आहेत. शाश्वत हमीभाव केंद्रातून गरजू शेतकऱ्यांच्या मूलभूत अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना वेळोवेळी कर्ज पुरवठा केला.
शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती संपून त्यांना सुगीचे दिवस यावेत याकरिता शेती सुधारण्यासाठी मध्यम कर्ज पुरवठा ही केला. लाख जीवांचा पोशिंदा असलेला शेतकरी जगला पाहिजे. सुखाचे दोन घास त्यांना वेळेवर मिळाले पाहिजे. हीच त्यांची मनोधारणा आहे. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन त्याप्रमाणे तातडीने निर्णय घेणे ही त्यांच्या कार्याची शैली आहे. त्यामुळेच शेतकरी असो वा व्यापारी असो यांची खंबीर साथ त्यांच्या नेतृत्वाला लाभत आहे. यावरूनच अल्पावधीत दाखविलेल्या कुशल नेतृत्वाची चुणूक दिसून येते.
म्हेत्रे घराण्याचे प्रथमेश म्हेत्रे यांच्या रूपाने राजकारणातील ही तिसरी पिढी आता जनतेच्या सेवेसाठी सिद्ध झाली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी दुधनीच्या शाश्वत विकासाचा मार्ग सुकर होऊन बहरत जात आहे. यात तिळमात्र शंका नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यांचे आजोबा राजकारणात थोर विकास पुरुष ठरलेले स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा त्यांना भरभरून वारसा लाभला आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करतानाच वडील शंकर म्हेत्रे व काका माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अनुभवी मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या हितासाठी सदैव सक्षमतेने उपयोग करण्याची त्यांची मनीषा कायम ठेवली आहे. तमाम दुधनीकरांच्या दृष्टीने हा दुग्धशर्करा योग आहे, असेच म्हणावे लागेल.
म्हेत्रे परिवाराने चांगल्या निर्णयांना साथ देण्याचे काम यापूर्वीही केले असून यापुढेही करतील पण बाजार समितीसमोर अनेक आव्हाने असून त्यादृष्टीने ते काम करत आहेत.
महाराष्ट्रातील काही बोटावर मोजण्याइतक्या स्वच्छ कारभार करीत असलेल्या मार्केट कमिटीमध्ये दुधनी मार्केट कमिटीचा समावेश आहे. या मार्केट कमिटीच्या सभापती म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वात लहान वयात अर्थात अवघ्या २३ व्या वर्षी सभापती म्हणून नेमणूक करून दुधनीकरांनी प्रथमेश म्हेत्रे यांच्या रुपाने युवा नेतृत्वाचा संदेश दिला आहे. तालुक्याचे तत्वप्रणाली नेते स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या राजकीय वारस म्हणून सभापती पदावर त्यांचे नातू प्रथमेश म्हेत्रे यांची नेमणूक झाल्यानंतर आनंद द्विगुणित झाला आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. पणन संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यातील बाजार समित्यांतर्गत सन २०२१-२२ या वर्षात क्रमवारी काढण्यासाठी निकष देण्यात आले होते. यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील दुधनी बाजार समितीच्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधा, कार्यपध्दतीमुळे जिल्ह्यात दुसरा क्रमांक आणि राज्यातील ३०५ बाजार समितींच्या क्रमवारीत २१ वा क्रमांक सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या रुपाने स्मार्ट प्रकल्पांतर्गत दुधनी बाजार समितीने दुसरा क्रमांकावर पटकावला आहे.
आजोबा स्व.सातलिंगप्पांचे स्वप्न पुर्ण करण्याचा मानस असल्याचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी सांगितले. शासनाने पायाभूत सुविधा, इतर सुविधा, आर्थिक कामकाज निकष, वैधानिक कामकाज, इतर निकष असे उद्दिष्ट नेमून दिले होते. सादर केलेल्या माहितीची सहाय्यक निबंधक सहाय्यकांनी तपासणी करून निकषानुसार गुणांकन देऊन बाजार समितीची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर यांचेमार्फत सादर केले होते.
आजोबांच्या शिकवणीतून दुधनी बाजार समितीचा कारभार सुरू आहे. शासकीय क्रमवारीत दुधनी बाजार समितीचा जिल्ह्यात दुसरा तर राज्यात २१ वा क्रमांक मिळाल्याची बातमी कळताच संपूर्ण अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दाम मिळावा यासाठी स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या संकल्पनेतुन दुधनी येथील बाजार समिती कार्यरत आहे. चाळणी न करता रोख पट्टी देण्याची व्यवस्था याठिकाणी आहे. वडिलांचे स्वप्न पूर्णत्वाच्या दिशेने असल्याचे दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकर म्हेत्रे यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर जनतेने दिलेला कौल सर्वस्वी महत्त्वाचा मानून त्यांची प्रामाणिकपणे सेवा करणे आणि सर्व समावेशक नेतृत्व करणे ही बाब म्हेत्रे घराण्याला नवी नाही. त्याच शाश्वत विकासाच्या वाटेवरुन प्रथमेश म्हेत्रे यांच्या प्रवासाचा आरंभ झाला आहे.
प्रथमेश म्हेत्रे हे सध्या तालुक्यातील युवकांचे आयडॉल बनले असून एक धडाडीचे कार्य कुशल उमलते नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. शाश्वत विकासाशिवाय समृद्धी येत नाही. हे त्यांना सुरुवातीपासूनच ठाऊक असल्यामुळे शेतकऱ्यांचा, व्यापारांचा शाश्वत विकास हाच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू ठरला आहे. आता प्रथमेश म्हेत्रे यांच्या कडून भविष्यात दुधनी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान होऊन दुधनीच्या सर्वांगीण विकास कामाच्या माध्यमातून कायापालट करतील अशी मोठ्या अपेक्षा सर्व सामान्य जनतेतून निर्माण झाल्या आहेत. त्या प्रथमेश म्हेत्रे नक्कीच पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.