उत्तर सोलापूर : महाक्षेत्र मारुडी आदिस्थान । महाकालची शक्ती नांदे निदान । तुझ्या दर्शनी मुक्ती होय सर्व लोका । यमाई यमाई असे नित्य घोका ।` महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची मोठी बहीण असलेल्या व एक हजार वर्षांची परंपरा असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्डी येथील श्री यमाईदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास उद्या सोमवार (दि-२६ ) पासून प्रारंभ होत आहे. North Solapur: Start of Yamaidevi Navratri Festival of Srikshetra Mardi
श्रीदेवी सप्तशती या ग्रंथाचे रचनाकार महान शिवभक्त श्री मार्कंडेय ऋषी यांची तपोभूमी म्हणूनही मार्कंडेय पुराणात मारोडी या गावाचा उल्लेख आढळतो. त्यामुळे मार्डी या तीर्थक्षेत्राला प्रतिकाशी म्हणून वारसा लाभला आहे. देवी भागवत ग्रंथामध्येही या गावाचा उल्लेख आढळतो. तुळजाभवानीच्या दर्शनानंतर मार्डीच्या यमाईदेवीचे दर्शन घेण्याची परंपरा भाविक पाळतात. तर विवाहानंतर नवदांपत्य वाहूर यात्रेसाठी तुळजापूरनंतर श्रीक्षेत्र मार्डी येथे दर्शनासाठी येतात, हे देखील या स्थानाचे महात्म्य आहे.
उद्या सोमवारी सकाळी नऊ वाजता देवीची महापूजा व घटस्थापना करण्यात येणार आहे. दररोज पहाटे साडेचार वाजता महापूजा, सकाळी नऊ वाजता नित्यपूजा आणि रात्री आठ वाजता शेजारती हे नवरात्रोत्सवकाळातील दिनक्रम आहे. शुक्रवारी (दि. ३०) ललिता पंचमी असून पुढच्या सोमवारी ( दि. 3) सकाळी अकरा वाजता आद्य देवीभक्त रंगनाथ स्वामी मोकाशी यांच्या निवासस्थानी असलेल्या श्री रेणुकादेवी मंदिरात नवचंडी होम होईल.
दि. ४ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता देवीच्या मंदिरात नवचंडी होम होणार आहे. रात्री एक वाजता अजाबली होईल. बुधवार, ५ आक्टोबर रोजी विजयादशमी दिवशी सायंकाळी सात वाजता सिमोलंघनानिमित्त देवीची पालखी मिरवणूक निघणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
¤ उद्या घटस्थापना; पाहा शुभ मुहूर्त
#सुराज्यडिजिटल
#घटस्थापना #surajyadigital
यंदा घटस्थापना सोमवारी म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी होत असून नवरात्रारंभ होत आहे. सोमवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजेच पहाटे पाच वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून 45 मिनिटांपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल. दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ही माहिती दिली आहे.
#नवरात्री #रंग
□ नवरात्रीचे नऊ रंग; पाहा
26 सप्टेंबर- पांढरा
27 सप्टेंबर- लाल
28 सप्टेंबर- नारंगी
29 सप्टेंबर- पिवळा
30 सप्टेंबर – हिरवा
1 ऑक्टोबर- राखाडी
2 ऑक्टोबर- निळा
3 ऑक्टोबर- जांभळा
4 ऑक्टोबर – गुलाबी