कुर्डूवाडी / हर्षल बागल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा सोलापूर जिल्ह्याची विशेष स्नेहबंध आहेत. पवार पहिल्यांदा मंत्रीमंडळात गेले अन् सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्र्याची धुरा त्यांच्यावर आली, त्यामुळे पहिल्यापासून पवार आणि सोलापूर जिल्हा एक विशेष नाते राहिलं आहे. The ‘price’ of sugar emperors increased, now will the sugarcane ‘rate’ increase Sanjaymama Babandada factory
काल परवा माढा तालुक्याचे माजी आमदार व पहिले सभापती स्वर्गीय विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या उद्घाटनाला पवारांचा दौरा झाला. शरद पवार जिल्ह्यात येणार म्हटल्यावर साखर सम्राटांची लॉबी खुश होती. आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे, व राज्यभरात अर्धा डझन कारखान्याचे चेअरमन असलेले अभिजीत पाटील या विशेष तीन कारखानदारांचा भाव मात्र पवारांचा दौरा वाढवून गेला.
मला यशवंतराव चव्हाण सारखे गुरु म्हणून व्यक्तिमत्त्व मिळाले, तर माढा – करमाळा या दोन्ही तालुक्यांना संजय मामा आणि बबन दादा सारखी चांगली कर्तुत्ववान माणसे मिळाली, हे माढा आणि करमाळाकरांचे भाग्य आहे , असे गौरव उद्गार शरद पवारांनी काढले. तर बारामती ला जाता जाता अर्धा डझन कारखान्याचे चेअरमन असलेले पंढरपूरचे अभिजीत पाटील यांना देखील गाडीमध्ये लिफ्ट दिली.
आता ही लिफ्टमध्ये आयकर विभागाच्या छापांची चर्चा झाली की राष्ट्रवादीत प्रवेशाचा निमंत्रण दिलं गेलं हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
आमदार बबनदादा आणि आमदार संजय मामा, अभिजीत पाटील हे तिघेही कारखानदारांनी शरद पवारांच्या दौऱ्यात स्वतःचा भाव वाढवला. आता स्वतःचा भाव वाढवला खरं पण जिल्ह्यातले कारखानदार आता उसाचा दर वाढवणार का ?याकडेही शरद पवारांच्या दौऱ्या एवढेच शेतकरी आणि सभासदांचे लक्ष लागलेला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मागील वर्षीपेक्षा यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन कारखाने जास्त चालू होणार असल्याने कारखानदारांमध्ये सुद्धा ऊस नेण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. करमाळ्याचा आदिनाथ सहकारी साखर कारखाना मंत्री सावंत यांच्या मदतीने माजी आमदार नारायण पाटील आणि बागल गटाच्या सर्वेसेवा रश्मी बागल या दोन गटांमध्ये हा कारखाना चालवला जाणार आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातला बराच ऊस हा आदिनाथ बाहेर जाऊ न देण्याची फिल्डिंग लावू शकतो. आदिनाथ चालू होतोय खरा पण दर किती देणार याबाबतीत मात्र शेतकऱ्यांमध्ये अनेक प्रश्नचिन्ह आहेत.
तर पंढरपूरचा बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना अभिजीत पाटलांच्या विजयामुळे पुन्हा एकदा सुरू होतोय अभिजीत पाटील देखील इतर कारखानदारांच्या रेस मध्ये उतरल्याने तेथील शेतकऱ्यांच्या ऊस दरवाढीच्या बाबतीत अशा पल्लवीत झालेल्या आहेत. मागील वर्षी हे दोन्ही कारखाने बंद असल्याने शेतकऱ्यांनी पर्याय शोधत इतर कारखान्यांना ही ऊस घातला. पण कारखानदारांमध्ये सुद्धा आता ऊस तोडण्याची स्पर्धा लागेल या आशेवर कमीत कमी ऊस दराची वाढ तरी होईल ही भोळी आणि भाबडी अशा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागून राहिलेली.
मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये विठ्ठलराव सहकारी साखर कारखाना यांनी उच्चांकी गाळप करीत देशांमध्ये विक्रम प्रस्थापित केला . आणि देशात पहिला क्रमांक ठरला गेला. साखर आयुक्त शेखर गायकवाड त्यांनी आमदार बबनदादांना सहज बोलत बोलत विचारले की दादा आपण शेतकऱ्यांना दहा दिवसात पेमेंट देऊ शकतो का? यावर बबनदादांनी मान हलवत होकार दिला आणि मागील वर्षी दहा ते बारा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पेमेंट देणारा जिल्ह्यातला नव्हे तर राज्यातला पहिला कारखाना म्हणून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची नोंद घेतली गेली.
आमदार बबनदादा दराच्या बाबतीत म्हणतात , शेतकऱ्यांनी ऊस घालवायला गडबड करू नये, ऊस वेळेच्या अगोदर गेल्यास रिकव्हरी कमी येते . आणि रिकव्हरी कमी आल्यास त्याचा परिणाम दर जास्त देण्यास अडचणी निर्माण होतात. जर यंदा रिकवरी चांगली मिळाली, तर आम्ही दर देखील वाढवून देऊ असेही आमदार बबनदादा शिंदे यांनी सुराज्य शी बोलताना सांगितले.
तर दुसऱ्या बाजूला आमदार संजय मामा शिंदे यांचा म्हैसगाव चा विठ्ठल शुगर प्रायव्हेट लिमिटेड हा कारखाना देखील दरवाढीच्या बाबतीत हिरवा कंदील देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंढरपूर तालुक्यातील आमदार परिचारक यांचा कारखाना देखील मागील वर्षीपेक्षा फुल ना फुलाची पाकळी म्हणून जास्त दर देऊ शकतो.
□ बदनाम साखर कारखानदारीला रूळावर आणावे लागणार
सोलापूर जिल्ह्यातील आर्यन आणि इंद्रेश्वर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बिलाच्या संदर्भात केलेला पोर खेळ यामुळे जिल्ह्यातील कारखानदारी बदनाम झाली होती. पण या बदनाम झालेल्या साखर कारखानदारीला रुळावर आणण्याचे काम आमदार शिंदे बंधू आमदार परिचारक आणि नवनिर्वाचित साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावर फार मोठी जबाबदारी असेल.
आमदार बबनदादा शिंदे यांना माढ्यातील मानेगाव येथील सुपुत्राच्या कारखान्याला शिस्तीचा लगाम घालावा लागेल. बाकी आमदार बबनदादा आणि आमदार संजय मामा यांची कारखानदारी तशी बरीच म्हणावी लागेल.