• उपरोधात्मक पोस्ट शेअर करून घेतला खरपूस समाचार
सोलापूर : महापालिका प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या हुतात्मा स्मृती मंदिरातील एका नाट्य व्यवस्थापकाने थेट सोशल मीडियावर मी आत्मदहन करावे का अशी उपरोधात्मक पोस्ट शेअर करून प्रशासनाचा ढिसाळपणाचा खरपूस समाचार घेतला आहे. Due to the laxity of Smriti Temple administration, theater manager’s warning of self-immolation, Solapur
हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर या नाट्यगृहाच्या तारखा बुकिंग ऑनलाइन पध्दतीने आहे. ऑनलाइन पध्दतीने करणारे आयुक्त यांची बदली झाली. त्यांनी हे करताना नाट्य व्यवस्थापकांना एक शब्द दिला होता. बुकिंगच्या वेळी प्रत्येक तारखेच्या वेळेला वेगळेवेगळे डिपॉझिट भरावे लागेल. ते डिपॉझिट ४८ तासांमध्ये आम्ही परत करू असे शब्द दिले होते. परंतु, तो शब्द आजतागायत त्यांच्यानंतरचे अधिकारी पाळत नाहीत. दोन- दोन, तीन- तीन महिने डिपॉझिटची रक्कम रुपये दहा हजार ही मिळत नाही.
गेल्या दोन महिन्यात ऑनलाईन सेवा देणारे विभाग यांच्या दुर्लक्षतेमुळे अनेकांना अनेक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. ह्या ऑनलाईन सेवेबाबत या आठवडाभरात त्यांच्या प्रतिसादामुळे मनात एक विचार येऊन गेला आपण त्यांच्या कार्यालयात आत्मदहन करावे का? मी माझ्या पॅरेलेस आजाराला देखील खंबीरपणे टक्कर दिली.
मात्र महानगरपालिकेच्या असहकार्यामुळे गेली अनेक महिने मी माझ्यासोबतचे नाट्य व्यवस्थापक हैराण आहोत. सांगा.. सोलापूरच्या नाट्य रसिक हो। कशी तुम्हाला उत्तम उत्तम नाटके दाखवावी या सर्व प्रकारामुळे माझ्या मनातील नाराजी वाढत आहे. या हुतात्मा स्मृती मंदिराचे काय वैभव होते. हे मी हुतात्मा स्मृती मंदिर पायाभरणीपासून पाहिला आहे त्यामुळे वाईट वाटते, असे नाट्य व्यवस्थापक गुरू वठारे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ ती निघाली रागाच्या भरात घरातून अन् ग्रामस्थ आले तिच्यावर धावून
▪︎ मुलं पळवण्याच्या अफवेने घडला असताना अनर्थ
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुलकर्णी तांडा येथे गुरुवारी (ता29) सकाळी मुलं पळविणारी एक महिला आली आहे, अशी अफवा पसरली होती. तांड्यावरील सर्व ग्रामस्थ चवताळून तिच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे कुलकर्णी तांड्यावर एकच गोंधळ उडाला होता.
सुजाण ग्रामस्थांनी मध्यस्थी करत पोलिसांशी संपर्क केला आणि त्या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले.
सर्व चौकशी करुन पोलिसांनी खरी माहिती समोर आणली, ती महिला ही रागाच्या भरात घरातून निघून चालली होती. पोलिसांनी तिला तिच्या वडिलांना बोलावून सुखरुप हवाली केले. सुदैवाने तिला कोणत्याही प्रकारची मारहाण करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आफरोज हशमोद्दीन शेख (वय-३४ रा. सैफुल, सोलापूर) ही राहत्या घरातून रागाच्या भरात बुरखा घालून घरातून निघून गेली चालली होती. पायी जात असताना आफरोज शेख ही कुलकर्णी तांड्याकडे गेली. सोलापूर विजयपूर महामार्गावर असलेल्या कुलकर्णी तांड्यावर आफरोज शेखला बुरख्यात पाहताच सकाळी मोठा गोंधळ उडाला.
मुलं पळविणारी महिला आपल्या परिसरात फिरत आहे,अशी अफवा वाऱ्यासारखी तांड्यावर पसरली.काही तरुणांनी आणि इसमांनी तिला धक्काबुक्की देखील केली. पण,ग्रामपंचायत सदस्यांनी ताबडतोब मध्यस्थी करत मारहाण करणाऱ्यांना रोखले आणि महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केले.
कुलकर्णी तांड्यावरील ग्रामस्थांना बुरखा घालून जाणाऱ्या महिलेवर अधिक संशय बळावला. ग्रामस्थ त्याला पकडून जाब विचारु लागले. पण,ती बुरखा काढण्यास मनाई करत होती. मुलं पळविण्यासाठी आली आहे,असे सांगत तांड्यावरील ग्रामस्थांनी बुरखा काढला आणि धक्काबुक्की केली.
तांड्यावरील राहणारे चांदूबाई चव्हाण यांनी आफरोजला ग्रामस्थांच्या तावडीतून सोडविले आणि विजापूर नाका पोलिसांना माहिती दिली. ड्युटीवर असणारे बिट मार्शल हे ताबडतोब कुलकर्णी तांड्यावर गेले आणि या महिलेस ताब्यात घेतले. पोलीस ठाणे येथे आणून सविस्तर माहिती जाणून घेतली आणि मुलं पळविणारी महिला असल्याची अफवा असल्याची माहिती दिली. आफरोज शेखचे वडील हशमोद्दीन शेख यांना बोलावून घेऊन त्यांच्या ताब्यात दिले. सुदैवाने तिला मारहाण झाली नसल्याने तिच्या वडिलांनी सुटकेचा श्वास सोडला.