Thursday, March 23, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापूर । डॉक्टर घाबरले आयटीच्या धाडीला, खोके घेऊन निघाले सासूरवाडीला

Solapur. The doctor was scared of IT's raid, took the boxes and went to his mother-in-law's house

Surajya Digital by Surajya Digital
September 30, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
सोलापूर । डॉक्टर घाबरले आयटीच्या धाडीला, खोके घेऊन निघाले सासूरवाडीला
0
SHARES
552
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

● खबर मिळताच पोलिसांनी अडवले गाडीला

सोलापूर : आगीतून उटले अन् फुफाट्यात पडले अशी एक मराठीत म्हण आहे. याच म्हणीचा प्रत्यय गुरुवारी (ता. 29) सोलापुरातील एका नामांकित डॉक्टरला आला. Solapur. The doctor was scared of IT’s raid, took the boxes and went to his mother-in-law’s house

काही दिवसांपूर्वी आयटीच्या धाडीतून वाचलेले ते डॉक्टर अन् त्यांनी जमवलेली माया (काळा पैसा) घेऊन ते सासूरवाडीला निघाले. पण पोलिसांनी दाखवला रस्त्यातच त्यांच्या गाडीला रेड सिग्नल अन् सासूरवाडीला जाता-जाता पोलीस ठाण्यात जाऊन बसण्याची वेळ डॉक्टरवर आली.

त्याचे झाले असे काही दिवसांपूर्वी शहरातील काही नामांकित डॉक्टरांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. त्यामुळे सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

त्यावेळी अन्य एका डॉक्टराने त्यांनी जमवलेली माया दुसरीकडे हलवली होती. आता वातावरण शांत होताच तीच खोकी पुन्हा हॉस्पिटलमध्ये परतली. हीच खोकी दोन गाड्यांमध्ये भरुन डॉक्टर सासूरवाडीला निघाले होते.

त्यांच्या दोन्ही गाड्या रुपाभवानी मंदिराजवळ येताच पोलिसांनी अडवल्या. सासूरवाडीला निघालेल्या डॉक्टरांवर पोलीस ठाण्यात जाऊन बसण्याची वेळ आली.

● हॉस्पिटलमधून निघाल्या दोन, पोलीस ठाण्यात पोहचली एक गाडी

 

गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास रुपाभवानी मंदिराजवळील उड्डाणपुलाखाली जोडभावी ठाण्याचे पोलीस पथक थांबले होते. त्यांना तुळजापूरकडे जाणाऱ्या दोन गाड्या दिसल्या पोलिसांनी त्यांना अडवले. त्यापैकी एक गाडी आणि गाडीमधील डॉक्टरांना पोलीस ठाण्यात आणले. मात्र दुसरी गाडी कुठे गेली ? हे डॉक्टरांनाही कळले नाही.

 

● पोलीस निरीक्षक फोन उचलेना, ठाणे अंमलदार माहिती देईना

डॉक्टरांच्या गाडीमध्ये रोकड सापडल्याचे जोडभावी पेठ पोलिसांनी मान्य केले. मात्र ती रक्कम किती ?, काय कारवाई केली? यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी राऊत यांनी शेवटपर्यंत फोन घेतला नाही. पोलीस ठाण्यातील महिला ठाणे अंमलदार यांनी यासंदर्भातील माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे शेवटपर्यंत वस्तूस्थिती समजली नाही.

 

● तर्क-वितर्क, उलट-सुलट चर्चा

 

डॉक्टरांच्या दोन्ही गाड्यांमध्ये काही खोके इतकी रक्कम होती, अशी चर्चा सुरु झाली. प्रत्यक्षात मात्र एकच गाडी पोलीस ठाण्यात पोहचली. दुसरी गाडी कुठे गेली? कोणी नेली? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. त्यावरुन उलट-सुलट चर्चाही ऐकायला मिळत होती. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भातील अधिकृत माहिती पोलिसांकडून न दिली गेल्यामुळे चर्चा वाढतच गेली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

》 धाब्यावर दारू पिणे पडले महागात; मालकासह 13 दारुड्यांना अटक

□ हैदराबाद रोडवरील मातोश्री ढाब्यावरील प्रकार

सोलापूर – हैद्राबाद रोडवरील हॉटेल मातोश्री ढाबा येथे राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने छापा टाकून विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या चालकासह १३ मद्यपीना अटक केली. न्यायालयाने हॉटेल चालकास २५ हजार तर मद्यपींना प्रत्येकी ५०० रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी सुनावली.

काल बुधवार (दि.२८) रात्री १० वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने हैदराबाद रोडवरील हॉटेल मातोश्री येथे धाड टाकली. तेव्हा हॉटेलमध्ये ग्राहक बेकायदेशीर मध्य प्राशन करताना आढळून आले. पथकाने हॉटेलचा चालक नेताजी लिंबाजी जगताप (रा.दहीटणे ता. उत्तर सोलापूर) याचेसह अवैधरित्या दारु पिण्याकरिता बसलेल्या 13 मद्यपींना अटक केली. मद्यपीच्या ताब्यातून ३ हजाराचा माल जप्त केलाय. त्यांच्यावर दारुबंदी अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल केला.

 

 

पोलिसानी २४ तासात तपास करून आज गुरुवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने हॉटेलचालकास २५ हजार तर इतर मद्यपींना प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे एकूण ३१ हजार ५०० रुपये दंड ठोठावला.

ही कारवाई राज्य उत्पादनचे अधीक्षक नितीन धार्मिक व उप अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अंकुश आवताडे, उषा किरण मिसाळ, निरीक्षक बिराजदार, मुकेश चव्हाण, जवान शोएब बेगमपुरे, प्रियंका कुटे, चेतन व्हनगुंटी, प्रशांत इंगोले व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली असून सदर गुन्ह्याची फिर्याद चेतन व्हनगुंटी यांनी दिली.

□ नागरिकांना आवाहन

धाब्यावर दारू पिणे तसेच दारू पिण्याकरिता व्यवस्था उपलब्ध करून देणे हे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा आहे, नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अवैध धाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारू पिताना आढळून आल्यास त्यांचेविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

Tags: #Solapur #doctor #scared #IT'sraid #took #boxes #blackmoney #mother-in-law's #house#सोलापूर #डॉक्टर #घाबरले #आयटी #धाडी #खोके #सासूरवाडी #पोलीस
Previous Post

बार्शीच्या कसब्यातील मानाची ‘तुकाईदेवी’

Next Post

मनोहर सपाटेंना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
मनोहर सपाटेंना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

मनोहर सपाटेंना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

वार्ता संग्रह

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
« Aug   Oct »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697