□ दत्तामामांच्या प्रेमाखातर बैठकीला ; पक्षप्रवेशाचा निर्णय अद्याप नाही’
□ मिशन कॉर्पोरेशनसाठी सज्ज रहा; विखुरलेले पुन्हा एकवटले
The men in the box are different; But I am not one of them, Dattamama said ‘Enjoy, give joy to Chandanshive politics
• सोलापूर : खोक्यातील अन् डोंगरातील माणसे वेगळी, मी मात्र त्यातला नाही, असे सांगत जितका निधी दिला, ती सर्व कामे झाली आहेत, असे स्पष्ट करून भाजपकडून करण्यात आलेल्या टक्केवारीच्या आरोपाचे माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी दत्तात्रय भरणे यांनी खंडन केले. तर आगामी शहरातील नागरी समस्यावर आवाज उठवत प्रबळ विरोधीपक्षाची भूमिका निभावत मिशन कॉर्पोरेशनसाठी सज्ज राहण्याचा सल्ला दिला.
शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (ता. 7) भरणे यांनी आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भरणे हे यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सोलापूरचे पालकमंत्री असताना टक्केवारी घेऊन कामे दिल्याचा आरोप भाजपने केला होता. याबाबत विचारले असता त्यांनी या आरोपाचे खंडन करत खोके, टक्केवारी आणि डोंगरावरची माणसे सर्व काही वेगळी आहेत. मी दिलेला निधी आणि झालेली कामे जगजाहीर आहेत. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना मी फारसे महत्त्व देत नाही, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन झोपडपट्टीत फिरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकाच्या मनात रुजवण्याच्या सूचना भरणे यांनी केल्या. पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रत्येकांनी झटा शहरातील रस्ते, खड्डे, पाणी पुरवठ्याच्या समस्या घेऊन आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवा प्रबळ विरोधीपक्षाची भूमिका निभावत मिशन कॉर्पोरेशनसाठी सज्ज राहण्याचा कानमंत्र भरणे यांनी यावेळी बैठकीत दिला.
या बैठकीला पक्षाचे निरीक्षक शेखर माने, शहराध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सचिव संतोष पवार, महेश कोठे, ॲड.यू.एन.बेरिया, नलिनी चंदेले, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, प्रदेश सचिव शफी इनामदार, शंकर पाटील, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, प्रदेश महिला काँग्रेसच्या विद्या लोलगे, माजी नगरसेवक तौफिक शेख, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीता रोटे, लता फुटाणे, बिस्मिल्ला शिकलगार उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 ‘दत्तामामांच्या प्रेमाखातर बैठकीला ; पक्षप्रवेशाचा निर्णय अद्याप नाही’
● माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचे स्पष्टीकरण
माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र आपण दत्तामामा भरणे यांच्या प्रेमाखातर बैठकीला आलो, तसा माझा पक्ष प्रवेशा बाबतीत अद्याप कोणताच निर्णय झाला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्ष प्रवेशाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे चंदनशिवे यांनी सांगितले. चंदनशिवे यांच्या या वक्तव्याने त्यांच्या प्रवेशाचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.
वास्तविक चंदनशिवे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. मात्र सत्तांतरासह विविध कारणामुळे त्यांचा प्रवेश लांबत चालला आहे. त्यामुळे ते कधी राष्ट्रवादीत जाणार याची उत्सुकता लागली – आहे. दरम्यान, शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला बसपाचे माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांची उपस्थिती दिसली. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. चंदनशिवे हे पक्षाच्या कोणत्याच बैठकीला उपस्थित नव्हते ते कसे चंदनशिवे यांनी पक्षात प्रवेश निश्चित झाला का, असा सवाल उपस्थित करताच माजी पालकमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी आनंद घ्या आनंद द्या असे म्हणत चंदनशिवे हे आमच्यात पक्षात आहेत असे सांगितले.
मात्र चंदनशिवे यांनी मी मामाच्या प्रेमा खातर आलो, पक्षाच्या बैठकीला बसा म्हणून खुर्ची दिली म्हणून बैठकीला बसलो. भरणे मामा जेव्हा कधी बोलावतील, आपण तेव्हा निश्चित जाऊ. मात्र सध्या पक्ष प्रवेशाची कोणतीही प्रक्रिया झाली नाही. कार्यकर्त्यांचा विचार घेऊन आपण पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले.