Wednesday, March 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

धनुष्यबाण चिन्ह गोठवलं; नवीन चिन्ह शोधावे लागणार

Bow and arrow icon frozen; Election Commission Shinde Thackeray will have to find a new symbol

Surajya Digital by Surajya Digital
October 8, 2022
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
धनुष्यबाण चिन्ह गोठवलं; नवीन चिन्ह शोधावे लागणार
0
SHARES
253
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल आहे. अंधेरी पूर्वच्या निवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह कुणालाही मिळणार नाही. शिवसेनेसाठीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. अखेर शिंदे गटाने केलेली मागणी मान्य झाली असल्याचे बोलले जात आहै.

 

शिंदे व ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाण चिन्हासाठी अर्ज केला होता. परंतू आयोगाने हे चिन्ह गोठवले असून अंधेरी पुर्वच्या निवडणुकीसाठी शिवसेना हे नाव सुद्धा दोन्ही गटाला वापरता येणार नाही, असे आयोगाने सांगितले आहे.

 

सोमवारी दोन्ही गटाला नवीन चिन्ह निवडावे लागणार आहे. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती मिळाली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले आहे. हे चिन्ह आता ना एकनाथ शिंदे गटाला मिळणार, ना उद्धव ठाकरे गटाला मिळणार. सध्या हे चिन्ह दोन्ही गटांना वापरता येणार नाही. तसेच शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

Shiv Sena's 'Bow & Arrow' symbol claim | Election Commission of India passes interim order, says in Andheri East bye polls neither of the two groups shall be permitted to use the symbol "Bow & Arrow", reserved for "Shivsena". pic.twitter.com/QtC9iNhZ0X

— ANI (@ANI) October 8, 2022

 

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. दरम्यान हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असल्याची माहिती आहे. केवळ अंधेरी पोटनिवडणुकीकरता हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत नव्या चिन्हासाठी दावा करण्याचे निर्देशही आयोगाकडून देण्यात आले आहेत. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही.

 

ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर आपापले दावे करण्यात आले होते. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाची मॅरेथॉन बैठक पार पडली आणि या बैठकीत दोन्ही दाव्यांवर विचार करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं.

शिवसेना कुणाची यावर निवडणूक आयोग लवकरच निर्णय देण्याची शक्यता होती. शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटांनी धनुष्यबाणावर दावा केला. ठाकरे यांनी पुरावेही सादर केले. मात्र अचानक रात्री निवडणूक आयोगाकडून ठाकरे यांना मेल आला. त्यात कागदपत्रे नियमाप्रमाणे नसल्याचा उल्लेख होता. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाकरेंकडे नव्याने कागदपत्रे दाखल करण्याची वेळ आज दुपारी 2 वाजेपर्यंत होती. ती आता संपली आहे.

 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं की, आम्हाला याचं मोठं दु:ख झालं आहे. हा निर्णय धक्कादायक आहे. शिवसैनिकांसाठी हे फारच क्लेषदायक आहे. मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वासाठी हे धोकादायक आहे. गद्दारांचं हे पाप कधीही धुतलं जाणार नाही. बाळासाहेबांनी कष्टाने उभा केलेल्या शिवसेनेची अवस्था ही गद्दारांनी केली आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

 

“निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्हाला स्वीकारावा लागेल. दोन्ही बाजूंनी चिन्ह मिळवण्याचे प्रयत्न झाले. पण आयोगाचा निर्णय स्वीकारणं आम्हाला बंधनकारक आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक घेऊन आम्ही आमची पुढची रणनीती ठरवणार आहोत,” असं शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले म्हणाले.

 

“हा निर्णय अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. केंद्रीय निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. सुप्रीम कोर्टात आतापर्यंत जे काही युक्तिवाद झाले आहेत, तिथे आमच्या वकिलांनी संभाव्य गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. पण तरीही निवडणूक आयोगाने असा निर्णय घेणं धक्कादायक आहे”, असं खासदार अनिल देसाई वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

 

□ ‘एकनाथ शिंदेंनी अघोरी विद्येनं अघोरीपणा करू नये’

शिवसेनेचे ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. हे फक्त पैशाच्या जोरावर संघटना फोडायला निघाले आहेत. यांना काही वाटत नाही का? सगळं मला मिळावं असं करू नये. एकनाथ शिंदेंनी अघोरी विद्येनं अघोरीपणा करू नये असं माझं शिंदेंना सांगणं आहे. अजून शिवसैनिक शांत आहेत.. शिवसैनिक कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहेत, असे खैरे म्हणाले आहेत.

Tags: #Bowandarrow #icon #frozen #ElectionCommission #Shinde #Thackeray #find #newsymbol#धनुष्यबाण #चिन्ह #गोठवलं #नवीनचिन्ह #शोधावे #एकनाथशिंदे #उद्धवठाकरे #निवडणूकआयोग
Previous Post

loanapp लोन ॲपच्या नावाने घातला अनेकांना गंडा; सोलापुरी ‘पुणेकर’ टोळीला पुणे पोलिसानी लावला ‘मोका’

Next Post

पवार काका पुतण्याने 20 वर्षे मला घरात कोंडून ठेवले; विनोदवीर आमदाराने बारामतीकरांवर डागली तोफ

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पवार काका पुतण्याने 20 वर्षे मला घरात कोंडून ठेवले; विनोदवीर आमदाराने बारामतीकरांवर डागली तोफ

पवार काका पुतण्याने 20 वर्षे मला घरात कोंडून ठेवले; विनोदवीर आमदाराने बारामतीकरांवर डागली तोफ

वार्ता संग्रह

October 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Sep   Nov »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697