》विस्तवाशी खेळण्याचा मोह नाही आवरत
सोलापूर : सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी शरद पवार व अजित पवारांवर टीका केली आहे. आम्ही पवारांची चप्पल सुद्धा उचलून त्यांच्या पायापाशी ठेवली होती. मात्र पवार काका पुतण्याने 20 वर्षे मला घरात कोंडून ठेवले. त्यांनी कायम शेकापच्या गणपतराव देशमुखांना मदत केली, त्यामुळे ते निवडून येत होते. याआधी राष्ट्रवादी नेते दीपक साळुंखेंनी बोलताना बापूंना डिवचले होते. Sharad Pawar uncle nephew locked me in the house for 20 years; Vinodveer MLA fired cannon at Baramatikars Shahjibapu Patil
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील विनोदवीर ठरलेले आमदार शहाजीबापू पाटील यांनी शनिवारी । बारामतीकरांवर तुफान फटकेबाजी केली. वाकीशिवणी येथील एका कार्यक्रमात काका-पुतण्यावर तोफ डागत असतानाच शहाजीबापूंना शरद पवारांवर टीका न करण्याचे आवाहन एका नेत्याने केले. पण त्यानंतर त्यांचे पित्त चांगलेच खवळले. माझा जन्म मुळीच चुलीजवळ झाला आहे. त्यामुळे विस्तवाशी खेळण्याचा मोह मला नाही आवरत असे म्हणताच हास्याची लाट उसळली. झाले असे की- सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील धाराशिव साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा प्रारंभ शनिवारी (ता. 8) शहाजीबापूंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला.
त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक साळुंखे यांनी आमदार पाटील यांना यापुढे जपून बोलावे. शक्यतो शरद पवारांवर टीका न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पुढे जाऊन शहाजीबापू म्हणाले की माझा जन्मच चुलीजवळ झाला आहे. त्यामुळे मला विस्तवाशी खेळण्याचा मोह आवरत नाही. पंढरपूर येथील विठ्ठल कारखान्यावर पवार आले होते. त्यावेळी शरद पवार यांच्या पायापुढे चपल्या काढून ठेवायचो. तरीही पवार काका पुतण्यांनी राजकारणात २० वर्ष मला कोंडून ठेवले. यांचे साक्षीदार माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आहेत. राजकारणात पवारांनी माझे एकप्रकारे राजकीयदृष्ट्या खच्चीकरण केल्याचा गंभीर आरोप केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
■ आधी बोलले, नंतर दैवत मानले
दीपक साळुंखे यांनी विधानसभा निवडणुकीत शेकाप उमेदवाराच्या विरोधात जाऊन शहाजीबापू यांना मदत केली होती. त्यामुळे साळुंखे यांनी त्यांना शरद पवार यांच्यावर टीका न करण्याचे आवाहन केले. तरीही त्यांनी आपल्या माणदेशी शैलीमध्ये पवारांचा समाचार घेतला. नंतर मात्र त्यांनी सारवासारव करत शरद पवार माझे दैवत आहेत, यापुढे त्यांच्या विषयी बोलणार नाही, अशी स्पष्टोक्ती केली.
यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, उपाध्यक्ष प्रेमलता रोंगे, संचालक धनंजय काळे, दिनकर चव्हाण, हणमंत पाटील आदी उपस्थित होते. सांगोला कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीसाठी अभिजीत पाटील यांनी दोनशे रुपयांचा हप्ता या वेळी जाहीर केला.
■ राग अजूनही डोक्यात…
सांगोल्यात प्रत्येक वेळी पवार यांनी शहाजीबापूंच्या विरोधात शेकापला पाठिंबा देत राहिल्याने शहाजीबापू यांची राजकीय कोंडी होत होती. पवारांच्या मदतीमुळे शेकापचे गणपतराव देशमुख विजयी होत आणि शहाजीबापू पराभूत होत असत. आपल्या राजकीय वनवासाला शरद पवार आणि अजित पवार हे दोघेच जबाबदार असल्याचा राग शहाजीबापू पाटील यांच्या डोक्यात कायम आहे. त्यामुळेच पवारांवर टीका करणे बंद करा म्हंटल्यावर पवार काका पुतण्याने २० वर्षे मला घरात डांबून ठेवले आणि आता मला त्यांच्यावर बोलू नका असं हा म्हणतोय, असं म्हणत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली.