मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपनं निवडणूक लढवू नये, असं आवाहन केलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Andheri by-election: Devendra Fadnavis’ response in few words to Raj Thackeray’s letter
भाजपने उमेदवार दिला असल्याने त्यावर आता मला भूमिका बदलता येणार नाही. पण पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं ते म्हणाले आहेत. परंतु, त्याबाबत पक्षातील वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी लागेल, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज यांच्या भूमिकेबाबत ‘सस्पेन्स’ ठेवला. ‘पक्षातील चर्चेअंती निर्णय घेऊ आता तो घेता येणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडमोडींना वेग आला आहे. या निवणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात थेट लढत होत आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गट-भाजपा तसेच उद्धव ठाकरे गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. या पोटनिवडणुकीमध्ये मनसेची भूमिका काय असेल, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.
राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांची ही भेट अंधेरी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाली असल्याचे वृत्त आहे. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीसंदर्भात भाजपाला पत्र लिहून आवाहन केले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असून भाजपाने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे. आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन केलंय.
राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून भाजपाने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे.”दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. या जागेवर रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार झाल्याने त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल,” असे राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
भाजपने उमेदवार दिला असल्याने त्यावर आता मला भूमिका बदलता येणार नाही. परंतु, त्याबाबत पक्षातील वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी लागेल, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज यांच्या भूमिकेबाबत ‘सस्पेन्स’ ठेवला. ‘पक्षातील चर्चेअंती निर्णय घेऊ आता तो घेता येणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया देऊन राज यांच्या प्रस्तावाबाबत पक्षातील नेत्यांसोबत बोलावे लागणार असल्याचे सांगितले. ‘या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला साथ देण्याबाबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरे यांना भेटले. या भेटीत पाठिंबा देण्याची विनंती शेलार यांनी केली होती. त्यानंतर राज यांनी पत्र लिहिले आहे. परंतु, मी एकटा निर्णय घेऊ शकणार नाही. आम्ही उमेदवार दिला असल्याने या स्थितीत मला अन्य कोणतीही भूमिका घेता येणार नाही,” असेही फडणवीस यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी आम्हाला विनंती केली तेव्हा आम्ही योग्य भूमिका घेतली. पण आताच्या परिस्थितीत मला निर्णय घेता येणार नाही. आमच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करावी लागेल. त्यामुळे चर्चा झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देऊ शकेल. त्यांनी चांगल्या भावनेने पत्र पाठवलं आहे. आम्ही त्या पत्राचा विचार करु पण निर्णय चर्चेअंती होईल,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
□ शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले…
मला प्रामाणिकपणे वाटते अंधेरी निवडणूक बिनविरोध व्हावी याने महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल, असं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्या, असं आवाहन पवारांनी केलं. प्रत्येक पक्षाला भूमिका घेण्याचा अधिकार असतो. (मनसे) भूमिका घेतली तर तक्रार करायचे कारण नाही, असंही ते म्हणाले.