मोहोळ / संजय आठवले
सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदार संघातून बनसोडे यांनी दोन वेळा निवडणूक लढवली. पहिल्या म्हणजे २००९ च्या निवडणुकीत त्यांना पराजय पत्करावा लागला परंतु दुसऱ्या टर्ममध्ये ते केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराजय करून निवडून आले. ही गोष्ट भाजपाच्या व सोलापूर मतदार संघाच्या दृष्टीनेही साधी आणि सामान्य नव्हती, हे मान्य करावेच लागेल. तशा अर्थाने हा एक चमत्कारच होता. Again Hariom… Vakilsaheb in the arena again? Sharad Bansode Solapur MP
मात्र या चमत्कारापाठीमागे बनसोडे यांचे कष्ट आणि सर्वसामान्य कार्यकर्ता आणि मतदार यांच्याशी कुठलाही अभिनिवेष न ठेवता त्यांनी ठेवलेला संपर्क कारणीभूत होता. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा ॲड. शरद बनसोडे यांची गरज असल्याची भावना भाजपाच्याच कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
शरद बनसोडे यांनी सावरकर विचार मंचच्या माध्यमातून जिल्ह्यात व मतदार संघात कार्यकत्यांचे जाळे तयार केले. माणसे जोडली. जनसंपर्क निर्माण केला. त्यामुळे ते विजयाजवळही पोहोचले. त्यांच्यासाठी तसा मतदार संघ नवखाच होता. आधी वकिली नंतर चित्रपटसृष्टी आणि मग राजकारण असा त्यांचा प्रवास होता. अशा परिस्थितीतही त्यांची नौका खासदारकीच्या पैलतिरी पोचली ती केवळ सर्वांशी संपर्क आणि थेट बोलणं यामुळेच.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तसे बघितले तर सोलापूर मतदारसंघ हा सुशीलकुमार शिंदे यांचा तसा बालेकिल्लाच, पण या किल्ल्याला कसा छेद गेला, हे त्यांना कळलेच नाही. शिंदे यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून चांगली आघाडी मिळाली होती, परंतु इतर ठिकाणी त्यांचे मताधिक्य घटले होते. मोदी लाट म्हणा किंवा काहीही म्हणा परंतु मतदारांनी बदल घडवला होता, हे मात्र नक्कीच.
बनसोडे हे त्यावेळी राजकारणात नवखे वाटत होते. परंतु त्यांनी ग्रामीण भागात चांगलाच संपर्क ठेवला होता. व्यक्तीगत कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखत जात होते. त्यांचा निधी ग्रामीण भागात खेड्या पाड्यात वाड्या वस्त्यावरच नव्हे तर अनगरच्या १२ वाड्यामध्येही पोचवला अन अनगरकरांशीही जवळीकही केली होती. परंतु पक्षाने त्यांना २०१९ डावलले. त्यांच्याऐवजी डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांना उमेदवारी दिली. ते निवडूनही आले. खरे परंतु त्यांच्या जातीचा दाखला वादग्रस्त ठरला.
यात मतदार अन कार्यकर्ते मतदार यांचाही गोंधळ उडाला आहे आणि ते महाराज असल्यामुळे म्हणावे तसे त्यांना आजही जनतेत मिसळता आले नाही अन कार्यकर्त्यांनाही त्यांच्या जवळ पोचता येईना, अशी अवस्था झाली आहे.
□ मागास वर्गातील जनताही नाराज
या साऱ्या घडामोडीत मतदार तर नाराज झालाच परंतु मागास वर्गातील जनताही नाराज झाली मग बनसोडे कशात वाईट होते ? असा प्रश्न आज निर्माण होवू लागला आहे. परंतु बनसोडे जरी खासदार नसले तरीही तितक्याच आपुलकीने कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतात अन कार्यकर्तेही त्यांना मित्रासारखे आवर्जून भेटतात अडचणी सांगतात अन कामेही करून घेतात. ते आजही पक्षाचे प्रामाणिक गटबाजी विरहीत काम करतात. त्यामुळेच बनसोडे सर्वांना जवळचे वाटतात यामुळे शरद बनसोडे यांना पुन्हा सोलापूर मतदारसंघातून मिळावे अशी भावना व्यक्त होत आहे.