□ भारताचा ट्रिपल धमाका ! विजयासह हार्दिक, कोहलीचे नवे रेकॉर्ड
वृत्तसंस्था : भारत पाकिस्तान यांच्यात आज रोमांचक सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सुपर विजय मिळवला. विराटने 82 रन बनवले. या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने नवे रेकॉर्ड केले आहे. विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय टी-20 त सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, तर हार्दिकनेही टी-20 त 1000+ धावा व 50+ विकेट्स असा अष्टपैलू विक्रम नोंदवला. टी-20 असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला. India’s ‘Virat’ win over Pakistan Virat Kohli t20 World Cup
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना झाला. या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 160 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने 4 गडी राखून हे आव्हान पूर्ण केले. भारताकडून कोहलीने ‘विराट’ खेळ केला. त्याने नाबाद 82 धावांची खेळी केली.
ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ सुमारे एक लाख प्रेक्षकांसमोर खेळतील. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अटीतटीच्या लढतीत भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरले. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ एक लाख प्रेक्षकांसमोर खेळले. सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा पहिला सामना आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी तीन विकेट घेतल्याने भारताने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर T20 विश्वचषक सुपर 12 गट 2 सामन्यात पाकिस्तानला 20 षटकात 159/8 पर्यंत रोखले.
.@imVkohli shone bright in the chase and was #TeamIndia's top performer from the second innings of the #INDvPAK #T20WorldCup clash. 🙌 🙌
A summary of his batting performance 🔽 pic.twitter.com/493WAMUXca
— BCCI (@BCCI) October 23, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अर्शदीपने पॉवरप्लेमध्ये फटकेबाजी करत बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला बाद केले पण शान मसूद आणि इफ्तिखार अहमद यांनी अर्धशतके ठोकून पाकिस्तानला खेळात रोखले. सरतेशेवटी, हरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनीही महत्त्वपूर्ण चौकार मारून पाकिस्तानचा एकूण 150 धावांचा टप्पा पार केला. तत्पूर्वी, भारताने महत्त्वपूर्ण चकमकीत नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. अटीतटीच्या लढतीत भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.
अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर टीम इंडियाची सरशी झाली. नाबाद 82 धावा करणारा विराट कोहली भारताच्या या विजयाचा खऱ्या अर्थानं नायक ठरला. पाकिस्ताननं या सामन्यात भारतासमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि भारतानं अखेरच्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर विजयी लक्ष्य गाठलं आणि खऱ्या अर्थानं मेलबर्नमध्ये दिवाळी साजरी केली. त्याचबरोबर टी20 वर्ल्ड कप मोहिमेची विजयी सुरुवात करताना गेल्या वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेतला.
□ असा सामना भारताच्या बाजूने झुकला
टीम इंडियाला अखेरच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज होती. त्यावेळी विराट आणि हार्दिक दोघंही मैदानात होते. पण मोहम्मद नवाजच्या पहिल्याच बॉलवर हार्दिक बाद झाला.
त्यानंतर पुढच्या बॉलवर कार्तिकनं 1 धाव काढली तर तिसऱ्या बॉलवर विराटनं 2 धावा काढल्या. त्यामुळे विजयाचं समीकरण 3 बॉल आणि 13 धावा असं होतं. याचवेळी विराटनं नो बॉलवर नवाजला सिक्स ठोकला आणि सामना भारताच्या बाजूनं झुकवला. पण मॅचमध्ये अजूनही ट्विस्ट बाकी होता.
कारण 3 बॉलमध्ये सहा धावा हव्या असताना फ्रि हिटवर विराट बोल्ड झाला पण त्याच बॉलवर टीम इंडियाला बाईजच्या रुपात 3 धावा मिळाल्या. बॉल स्टंपला लागून मागे गेला आणि त्यावर विराट आणि कार्तिकनं 3 धावा काढल्या. उरले 2 बॉल 3 रन्स. त्यावेळी नवाजनं वाईड बॉल टाकला आणि 2 बॉल 2 असं समीकरण बनलं.
पण पुढच्याच बॉलवर एक चोरटी धाव घेण्याच्या नादात कार्तिक बाद झाला. पुन्हा सामन्यात ट्विस्ट आला कारण भारताला त्यावेळी हव्या होत्या एका बॉलमध्ये 2 धावा. पण नवाजनं पुन्हा एकदा वाईड टाकला आणि त्यानंतर अश्विननं विजयी फटका मारुन भारताला सनसनाटी विजय मिळवून दिला.
□ W,W,W,W,W,W- अर्शदीप अन् पांड्याची कमाल
मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. हार्दिक पांड्याने तीन तर अर्शदीप सिंगने 3 विकेट घेत पाकिस्तानच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला.
अर्शदीपनं आपल्या 4 ओव्हर्समध्ये 32 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय हार्दिक पंड्यानं 3 तर शमी आणि भुवनेश्वरनं प्रत्येकी एक विकेट घेतली. पाकिस्तानकडून शान मसूद (ना. 52 ) तर इफ्तिकार अहमदनं (51) धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानला 8 बाद 159 धावांची मजल मारता आली.
□ असे आहेत खेळाडू
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), शान मसूद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.