□ वडिलांच्या डोक्यात मुलाने फरशी घालून केला खून
□ रुद्धेवाडी येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कोयत्याने खून
सोलापूर : सोलापूर शहर – जिल्ह्यात प्रत्येक घरात दिवाळी साजरा होत आहे. अशात सोलापुरात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. व्यसनाधिनतेतून आणि चारित्र्याच्या संशयावरून या दोन खुनाच्या घटना घडल्या. Two cases of murder in Solapur due to drug addiction and suspicion of character
दारू पिऊन आईसह कुटुंबातील सदस्यांना त्रास देणाऱ्या वडिलांच्या डोक्यात फरशी घालून मुलानेच खून केला. एमआयडीसी परिसरातील किर्ती नगरात काल रविवारी (ता. 23) मध्यरात्री घडली. आकाश बसवराज गवंडी (वय-२२, रा. सोलापूर) याला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले.
संशयित आरोपी आकाश व त्याचे वडिल बसवराज लक्ष्मण गवंडी (वय-५०,रा.सोलापूर) हे दोघेही ठेकेदाराकडे मिस्त्री म्हणून कामाला जात होते. मयत बसवराज यांना दारूचे व्यसन होते. आकाश हा देखील मद्यपान करायचा.
काल रविवारी घरी दोघेच होते. जेवण करून झोपल्यानंतर आकाशने मध्यरात्री फरशी स्वताच्या बापाच्या डोक्यात घातली. त्यात बसवराज यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आकाश रात्रभर मयत बसवराज यांच्याजवळच झोपी गेला.
आज सोमवारी पहाटेच्या सुमारास आकाश उठला आणि त्याने ठेकेदाराकडून ६०० रुपये घेतले. त्यानंतर त्याने थेट रेल्वे स्टेशन गाठले. हुबळी एक्स्प्रेसमधून विजयपूरला जाण्यासाठी त्याने तिकीट काढले आणि रेल्वेत जाऊन बसला.पण,एमआयडीसी पोलिसांना खूनाची वार्ता समजताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आकाशला रेल्वे सुटण्यापूर्वीच ताब्यात घेतले.
□ अन् पायाखालील जमीनच सरकली
आकाशचा लहान भाऊ हा बारावीमध्ये शिकतो. सतत होणाऱ्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून तो बालपणापासून मामाकडे राहायला होता. दिवाळीनिमित्त आकाशची आई देखील माहेरी गेली होती. दिवाळीसाठी लागणारे पदार्थ घेऊन आकाशची आई व भाऊ आज सोमवारी सोलापुरात आले होते. पण त्या दिवशी हा प्रकार त्यांना दिसला आणि त्यांच्या पायाखालील जमीनच सरकली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 रुद्धेवाडी येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कोयत्याने खून; पतीविरुद्ध गुन्हा
सोलापूर – चारित्र्याच्या संशयावरून २५ वर्षीय विवाहितेचा कोयत्याने खून केल्याची घटना रुद्देवाडी (ता.अक्कलकोट) येथे रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
शितल गणेश उपाडे (वय २५ रा.रेवली ता.परळी जि.बीड) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणात तिचा पती गणेश तुळशीराम उपाडे (वय २८) याच्याविरुद्ध अक्कलकोट दक्षिणच्या पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. काल रविवारी सकाळच्या सुमारास रुद्धेवाडी येथील मारुती पुजारी यांच्या शेताच्या बांधाजवळ शीतल उपाडे हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.
चारित्राच्या संशयावरून तिचा पती गणेश उपाडे याने कोयत्याने खून केला. अशा आशयाची फिर्याद पोलीस नाईक नबीलाल मियावाले यांनी पोलिसात दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काळे करीत आहेत .