सोलापूर : दोन समाजात तेढ निर्माण होण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह व्हिडिओ व्हाट्सअपवर स्टेटस म्हणून प्रसारित केल्याप्रकरणी एका २२ वर्षीय चायनीज गाडीवर काम करणाऱ्या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Solapur. Crime against young man for uploading offensive video on WhatsApp
ही घटना काल रविवारी (दि.२३) सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली. एका २२ वर्षीय तरुणाने त्याच्या मोबाईलवर दंगे घडवून आणण्याची चेथावणी देणारे व दोन जनसमाज यांच्यामध्ये तेढ निर्माण होण्याच्या उद्देशाने स्वतःच्या व्हाट्सअप क्रमांकावर व्हिडिओ व फोटो असलेला स्टेटस प्रसारित केला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक प्रमोद कुमार मोहन कांबळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
□ जिल्हा परिषद आवारातून दुचाकी पळवली
सोलापूर : जिल्हा परिषद येथील पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे दुचाकी (क्रमांक एम.एच.२४. डब्लू. ८८४२) ही पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने हॅण्डल लॉक तोडून व डुप्लिकेट चावीचा वापर करून चोरून नेली आहे.
ही घटना दि.१७ ऑक्टोंबर रोजी सकाळी पावणेदहा ते दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी सिद्धरामय्या मल्लय्या स्वामी (वय-४५,रा.सुभाष नगर जुळे, सोलापूर) यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मुलाणी हे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ यशराज नगरीजवळ अपघात ; तरुण जखमी
सोलापूर : यशराज नगरी अक्कलकोट रोड येथे दुचाकी (एम.एच.१३.ए.डब्ल्यु.२८०८) दुचाकीवरून यासीन शफिक नदाफ (वय-२२,रा. संगमेश्वर नगर,अक्कलकोट रोड) हा गाडीवरून जात होता. समोरून येणारा सिमेंटचा बलकर ट्रक क्रमांक एम.एच.१२.एक्स. १२७३ यातील चालकाने निष्काळजीपणाने ट्रक चालवून फिर्यादी यासीन याच्या मोटारसायकलीला धडक दिली.
या अपघातात यासीन याच्या पायाला दुखापत झाली असून, त्याच्या जखमी होण्यास ट्रकचालक कारणीभूत झाला आहे. अशा आशयाची फिर्याद यासीन नदाफ याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्याच्या फिर्यादीवरून वरील बलकर ट्रक क्रमांकच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक बागवान हे करीत आहेत.
□ अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले
सोलापूर : एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची घटना दि.२१ ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापुरात घडली.
याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात समाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे करीत आहे.