Wednesday, November 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Rana & kadu राज्यातील दोन आमदारांमधील संघर्ष टोकाला, थेट पोलिस ठाण्यात तक्रार

Rana & kadu conflict between two MLAs in the state, complaint directly to the police station

Surajya Digital by Surajya Digital
October 24, 2022
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
Rana & kadu राज्यातील दोन आमदारांमधील संघर्ष टोकाला, थेट पोलिस ठाण्यात तक्रार
0
SHARES
165
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ शिंदे गट आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता

□ यादवी युद्ध रंगण्याची शक्यता

□ शिंदे-फडणवीस सरकारला एकप्रकारे घरचा आहेर

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रवी राणांविरोधात आमदार बच्चू कडू यांची अमरावतीमधील राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. Rana & kadu conflict between two MLAs in the state, complaint directly to the police station

 

रवा राणा यानी बच्चू कडू याच्यावर गंभीर आरोप कल होते. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.

 

‘रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. 20-20 वर्ष आमची राजकीय करिअर उभं करायला गेली. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल, तर पैसे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेजी यांनी यांनी यांचं उत्तर दिलं पाहिजे’, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. रवी राणा यांनी केलेल्या आरोपांवरून बच्चू कडून चांगलेच आक्रमक झाले आहेत. बच्चू कडून यांनी एकेरी उल्लेख करत बच्चू कडू यांना आव्हान दिले आहे. “रवी राणा हा सत्तेत येऊन दुधही चाटतो आणि आमच्यावर आरोपही करतो. आरपारची लढाई करायची असेल तर मी त्याला तयार आहे. तो जिथे बोलवेल तिथे जाण्यास तयार आहे, अशी आक्रमक भूमिका बच्चू कडूंनी घेतली आहे.

 

एकनाथ शिंदेंच्या रूपाने शिवसेनेमध्ये अभूतपूर्व बंड झालं. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटामध्ये मोठा संघर्ष सुरु असल्याचं दिसून येत आहे. भाजपशी सातत्याने सलगी करू पाहणारे अपक्ष आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील संघर्षामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ‘यादवी’ युद्ध रंगण्याची शक्यता आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

बंडखोर आमदारांना खोके मिळाल्याचा आरोप दुसरा तिसरा कोणी केला नसून भाजपशी जवळीक असणाऱ्या रवी राणा यांनीच केला आहे. हा शिंदे-फडणवीस सरकारला एकप्रकारे घरचा आहेरच आहे. रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे बंडखोरांनी भाजपसोबत जाण्यासाठी पैसे घेतले, या विरोधकांच्या दाव्याला बळ मिळू शकते. त्यामुळे आगामी काळात ‘५० खोके, एकदम ओक्के’चा प्रचार पुन्हा जोमाने होऊ शकतो. त्यामुळे आता हा सगळा वाद एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, कसा हाताळणार, हे पाहणे आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

रवी राणा यांनी रविवारी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असा आशयाचे वक्तव्य रवी राणा यांनी केले होते. या वक्तव्यावर बच्चू कडू चांगलेच संतापले होते. रवी राणांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या वादामध्ये खेचले.

मी जर खोके घेतले असेन तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावे, असे जाहीर आव्हानच बच्चू कडू यांनी दिले आहे. यानिमित्ताने भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे.
फडणवीस यांच्याशी जवळीक असणाऱ्या रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटाच्या बंड हे पैसे आणि सत्तेच्या हव्यासापायी झाले होते, असा संदेश सामान्य जनतेमध्ये जाऊ शकतो.

त्यामुळे बच्चू कडू यांच्याप्रमाणे शिंदे गटातील आमदारही रवी राणांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवू शकतात. तसे झाल्यास शिंदे गट आणि भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच बच्चू कडू यांच्या या आव्हानामुळे शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ‘५० खोके, एकदम ओक्के’ची घोषणा देत बंडखोर आमदारांना जेरीस आणले होते. पावसाळी अधिवेशनात या घोषणेवरून रणकंदन झाले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) इतर नेत्यांकडून अधुनमधून खोक्यांचा उल्लेख होत असला तरी ‘५० खोके, एकदम ओक्के’ या वाक्याचा अनेकांना विसर पडला होता. परंतु, आता बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादामुळे खोक्यांचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. परिणामी या मुद्द्यावरुन शिंदे गटावर पुन्हा एकदा दोषारोप करण्याची संधी विरोधकांकडे चालून आली आहे.

Tags: #Rana&kadu #conflict #between #two #MLAs #state #complaint #directly #policestation#Rana&kadu #महाराष्ट्र #राणाकडू #दोन #आमदार #संघर्ष #टोकाला #थेट #पोलिसठाणे #तक्रार #अमरावती
Previous Post

सोलापूर । नंदेश्वर येथे सासूचा चाकूने खून; जावयाला अटक

Next Post

सोलापूर । राष्ट्रवादीतील बंडोबा शड्डू ठोकण्याच्या तयारीत; घड्याळ टाकून हाती ढाल – तलवार घेणार ?

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापूर । राष्ट्रवादीतील बंडोबा शड्डू ठोकण्याच्या तयारीत; घड्याळ टाकून हाती ढाल – तलवार घेणार ?

सोलापूर । राष्ट्रवादीतील बंडोबा शड्डू ठोकण्याच्या तयारीत; घड्याळ टाकून हाती ढाल - तलवार घेणार ?

Latest News

मोठे यश – सर्व 41 मजूर 17 दिवसाने बोगद्यातून बाहेर आले

मोठे यश – सर्व 41 मजूर 17 दिवसाने बोगद्यातून बाहेर आले

by Surajya Digital
November 28, 2023
0

...

अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरण; चौघांना सुनावली पोलीस कोठडी

अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरण; चौघांना सुनावली पोलीस कोठडी

by Surajya Digital
November 25, 2023
0

...

‘सरकारकडून अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे काम’

‘सरकारकडून अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे काम’

by Surajya Digital
November 24, 2023
0

...

जिल्ह्याच्या बसस्थानकांवर सामान्य नागरिकांसाठी ‘आपला दवाखाना’

जिल्ह्याच्या बसस्थानकांवर सामान्य नागरिकांसाठी ‘आपला दवाखाना’

by Surajya Digital
November 23, 2023
0

...

साईबाबा आणि तुकाराम महाराजांचा अपमान करणारे ‘बागेश्वरबाबा’ फडणवीसांना प्रिय

साईबाबा आणि तुकाराम महाराजांचा अपमान करणारे ‘बागेश्वरबाबा’ फडणवीसांना प्रिय

by Surajya Digital
November 22, 2023
0

...

जालन्यात धनगर आरक्षणाला हिंसक वळण, कलेक्टरची फोडली गाडी

जालन्यात धनगर आरक्षणाला हिंसक वळण, कलेक्टरची फोडली गाडी

by Surajya Digital
November 21, 2023
0

...

मोबाईल कंपनीच्या अभियंत्याला मागितली पन्नास हजाराची खंडणी

सूरत-चेन्नई महामार्ग; अंतिम नोटीसीची मुदत संपली, पोलीस बंदोबस्तात सक्तीने ताबा

by Surajya Digital
November 21, 2023
0

...

पंढरपूर शासकीय पूजा ‘या’ उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

पंढरपूर शासकीय पूजा ‘या’ उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

by Surajya Digital
November 19, 2023
0

...

ऐन कार्तिकी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात झिका व्हायरसचा शिरकाव

ऐन कार्तिकी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात झिका व्हायरसचा शिरकाव

by Surajya Digital
November 18, 2023
0

...

शिवतीर्थावर ठाकरे गट अन् शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, रॉडचा वापर केल्याचा आरोप

शिवतीर्थावर ठाकरे गट अन् शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, रॉडचा वापर केल्याचा आरोप

by Surajya Digital
November 17, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

October 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Sep   Nov »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© Website Design by Digital Buffalo - 9028927697