□ सासूचा खून करून दरोडा पडल्याचा देखावा; जावयाला अटक; नंदेश्वर येथील घटना
मंगळवेढा – जागेच्या वादातून सासूचा गळा कापून खून करून दरोडा पडल्याचा देखावा केल्याची घटना नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथे रविवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.या प्रकरणात मंगळवेढाच्या पोलिसांनी मयताच्या जावयास अटक केली. Solapur. Mother-in-law stabbed to death in Nandeshwar; Son-in-law arrested
शाकूबाई मारुती कोकरे (वय ४७ रा. नंदेश्वर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा खून केल्याप्रकरणी दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ याला मंगळवेढ्याच्या पोलिसांनी अटक केली. रविवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास शाकुबाई कोकरे यांचा मृतदेह गळा कापलेल्या अवस्थेत घरात आढळला. याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवेढाच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा दरोडेखोर किंवा चोरट्यांनी हा प्रकार केल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी मयताच्या जावई दादा उर्फ राजाराम शेजाळ आणि त्याची पत्नी यांना बोलावून चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या बोलण्यात तफावत आढळले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता दादा शेजाळ यानेच खून केल्याचे निष्पन्न झाले. मयत शाकुबाई कोकरे यांच्या वडीलांच्या (राजाराम शेजाळ) नावावरील ५ एकर शेतजमीन आपल्या नावावर करण्याकरिता शाकूबाई या सहकार्य करीत नसल्याच्या कारणावरून त्याने चिडून खून केल्याची कबुली आरोपीने दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्याप्रमाणे पोलिसांनी दादा शेजाळ याला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.
□ मान्सून संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी
शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मागील काही दिवसांत धुमाकूळ घातलेल्या मान्सूनने अखेर महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. मान्सून परतल्याने आता दिवाळीत पाऊस नसणार आहे. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतला आहे. तसेच महाराष्ट्रासह देशातून देखील मान्सून परतला आहे.