तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यवधी जणांचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या महाद्वारसमोर महायुतीच्यावतीने आज शनिवारी राज्य सरकारच्या विरोधात दूधरवाढीचे आंदोलन झाले. शेतकऱ्यांचे विज बील माफ झाले पाहिजे, यासाठी या सरकारला सद् बुद्धी येवु दे, या राज्य सरकारला जाग येवो म्हणून श्री तुळजा भवानी मातेच्या महाद्वारासमोर जागरण गोंधळ आंदोलन केले.
या आंदोलनादरम्यान तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केंद्र सरकारकडे जी.ए.स.टी.च्या माध्यमातून या राज्य शासनाला २० हजार कोटी रुपये मिळाल्याचे सांगितले. माञ हे सरकार कोवीड १९ च्या काळामध्ये राज्य सरकार आपणास मदत करीत नाही म्हणून सरकारला जाग यावी व मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना सद्बुद्धी देवो यासाठी जागरण गोंधळ केल्याचे सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आंदोलनादरम्यान भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, विशाल रोचकरी, आनंद कदंले, नागेश नाईक, शिवाजी बोधले, सचिन रसाळ, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, नारायण नन्नवरे, विक्रम देशमुख, प्रभाकर मुळे, दिनेश बागल, माहिला आघाडीच्या मिना सोमाजी, संजय खुरुद, नगरसेवक अभिजित कदम, रिपाईचे तानाजी कदम, सुहास साळुंके, बाळासाहेब भोसले, उमेश गवते, श्रीकांत हिराळकर, सागर कदम, गिरीष देवळालकर, कार्यकर्ते उपस्थित होते.