सांगली : शिराळा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूधदरवाढीसाठी राज्य सरकारच्या विरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे महाएल्गार आंदोलन माजी मंत्री शिवाजीराव नाईक, भाजप नेते सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाले.
आंदोलन तालुक्यातील शेडगेवाडी फाटा ,आरळा, फुफिरे फाटा, मांगले,सागांव, कणदूर, शिरशी अशा विभागांमध्ये झाले. या आंदोलनामध्ये दूध उत्पादक शेतकरी, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिराळा येथे शिराळा -इस्लामपूर मार्गावरती मार्केट यार्ड समोर माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर दहा रुपये अनुदान द्यावे, दूध पावडर साठी पन्नास रुपये अनुदान द्यावे अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख,रणजितसिह नाईक, महादेव कदम, प्रतापराव यादव, के डी पाटील, सम्राट शिंदे, प्रतापसिंह चव्हाण, प्राध्यापक सम्राट शिंदे विजय महाडीक, जगदीश कदम, राजू पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. मांगले, शेडगेवाडी फाटा, येळापूर, शेडगेवाडी, मेणी आरळा, फुफिरे,सागांव,कणदूर, शिरशी या ठिकाणी आंदोलने झाली.