सोलापूर : सोलापूर शहरात आज सुखद वार्ता आहे. आजच्या दुपारी आलेल्या अहवालानुसार तब्बल 130 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 3 हजार 191 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या अहवालात नव्याने 54 पॉझिटिव्ह तर एक मृत्यू आढळला आहे. आतापर्यत शहरात एकूण मृत्यू 365 तर बाधितांची संख्या 5 हजार 104 वर पोहचली आहे.
सोलापूर शहरात रविवारी कोरोनाचे 54 रुग्ण आढळून आले. आहेत. मृत्यूचे प्रमाण देखील घटले आहे. रविवारी एक मृत्यू झाला आहे. कोरोना मुक्त झाल्याची संख्या मोठी आहे. आज तब्बल 130 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये 69 पुरूष आणि 26 महिला रूग्णांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शहरातील एकूण कोरोना बाधितांची 5 हजार 104 संख्या झाली असून त्यामध्ये पुरुष 2 हजार 981 तर महिला 2 हजार 123 रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी एक कमला नगर येथिल 72 वर्षाच्या महिलेचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 365 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 240 तर महिला 125 रुग्णांचा समावेश आहे.
रविवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 669 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 615 अहवाल निगेटिव्ह तर 54 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 35 हजार 687 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 30 हजार 304 निगेटिव्ह तर 5 हजार 104 पॉझिटीव्ह आढळून आले.