बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. येडियुरप्पा यांनीच ट्विटरवरुन यासंदर्भात खुलासा केला आहे. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे, अशी माहिती येडियुरप्पा यांनी ट्विटवरुन दिली आहे. त्यांच्या पाठोपाठ आता त्यांंच्या मुलीची सुद्धा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना मणिपाल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
येडियुरप्पा हे कोरोनाचा संसर्ग झालेले देशातील दुसरे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी २५ जुलै रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ट्विट करून मला करोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती दिली होती.
मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी स्वतः ट्विट करुन चाचणी पॉजीटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘मी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलो आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. यादरम्यान माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करावं आणि निरीक्षण करावं’, असे आवाहन त्यांनी ट्वीट करत केले.
काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते त्याला २४ तासही उलटत नाहीत तोपर्यंतच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यासह उत्तर प्रदेशचे भाजप अध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.