कोल्हापूर : गेली दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कुदनूर – कालकुंद्री दरम्यानच्या मार्गावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे.
कुदनूर भागातील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. तर किटवाड लघु पाठबंधारा क्र. २ ओव्हरफ्लो झाल्यामुळे कुदनूर गावानजीक असलेल्या ओढ्याने नदीचे रूप धारण केले आहे. त्यामुळे ओढ्याच्या आसपासचे पूर्ण शिवार पाण्याखाली आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
किटवाड लघु पाटबंधारे तलाव क्र. २ येथून जॅकवेलमार्फत कुदनूर गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे ओढ्यातून पाणीपुरवठा करण्यात आलेली पाईपलाईन वाहून गेली आहे. त्यामुळे कुदनूर गावाचा पाणीपुरवठा पाईपलाईन दुरूस्त होईपर्यंत बंद झाला आहे. त्यामुळे तेथील लोकांचे हाल होत आहेत.
कालकुंद्रीकडून कुदनूरकडे जाणाऱ्या मार्गावरून मोठ्याप्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे रस्त्याच्या एका बाजुचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे तेथून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे.