सांगली : जिल्ह्यात दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर चांदोली परिसरात पंधरवड्यानंतर मंगळवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. चांदोली परिसरात धुवॉधार पाऊस सुरु आहे. यामुळे काखे – मांगले पूल पाण्याखाली गेले आहेत.
चांदोली धरणात गेल्या 24 तासात पाणीसाठा 23.92 टी. एम. सी. वरुन 26.33 टी. एम. सी. झाला आहे. 2.41 टी. एम. सी. ने पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या 24 तासात 6.08 टी. एम. सी.ने पाणीसाठा वाढला आहे. प्रतिवर्षी प्रमाणे जिल्ह्यात काखे-मांगे पूल वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्ह्याच्या पश्चिम भागात आज धुवॉधार पाऊस सुरु आहे. चांदोली धरण परिसरात आज सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली. काल 71 मिलीमीटर तर आज 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. चांदोली धरणात गेल्या 24 तासात 2.41 टीएमसीने वाढ झाली असून 26.33 टी. एम. सी. पाणीसाठा झाला आहे. 70.65 टक्के धरण भरले आहे.
इस्लामपूर, वाळवा, पलूस, भिलवडी, आष्टा परिसरात संततधार तर मध्य भागातील तासगाव, मिरज तालुक्यातही चांगला पाऊस होत आहे. पूर्व भागात हलका पाऊस सुरु आहे.
कोयना धरण परिसरात गेल्या 24 तासात धुवॉधार पाऊस पडतो आहे. कोयना येथे 214 मिलीमीटर, नवजाला 299 मिलीमीटर, महाबळेश्वरला 308 असा जोरादार पाऊस पडला आहे. कोयना धरणात गेल्या 24 तासात सहा टी. एम. सी. ने पाणीसाठा वाढला असून 60.28 टी. एम. सी. पाणीसाठा झाला आहे.