सांगली : सांगली जिल्ह्यात आज मनपा क्षेत्रात 210 नवीन रुग्ण, शहरामध्ये 13 रुग्ण, ग्रामीण भागात 55 रुग्ण वाढले आहेत. आज 278 बाधितांची भर पडल्याने सांगली जिल्ह्याची रुग्णसंख्या 3 हजार 750 वर पोहोचली आहे. आज बरे झालेले रुग्ण संख्या 1 हजर 579 आहे. उपचारा खाली 1 हजार 919 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 113 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे.
मनपा क्षेत्रातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे आजअखेरची ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 1 हजार 236, शहरी भागातील 262, मनपा क्षेत्रातील 2 हजार 252 अशी आहे. आज आरटीपीसी टेस्ट 670 घेण्यात आल्या, पैकी 217 रुग्ण पॉझिटिव्ह आले. 427 एंटीजन टेस्ट पैकी 63 रुग्ण पॉझिटिव्ह आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* तालुकानिहाय आजची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या
जत 1, कवठेमहांकाळ 25, खानापूर 9,मिरज 13,प् लुस 2 , शिराळा 7, तासगाव 9, वाळवा 2, सांगली 138, मिरज 72 अशी आहे.
आज अखेर ग्रामीण भागात 42 मृत्यू झाले, शहरी भागात 8 मृत्यू, सांगली 32, मिरज 29, कुपवाड 2, असे आहेत. आजच्या 6 मृतांमध्ये आष्ट येथील 80 वर्षांचा पुरुष, मिरज येथील 62 वर्षांचा पुरुष, बोरगाव येथील 90 वर्षांचा पुरुष, हनुमाननगर येथील 55 वर्षांची महिला, सांगली येथील 46 वर्षांची महिला, कुपवाड येथील 55 वर्षांची महिला असा समावेश आहे. पॉझिटिव्हपैकी ऑक्सिजनवर 19, व्हेंटिलेटरवर 15 रुग्ण आहेत.
* तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णसंख्या
आटपाडी 145, जत 185, कडेगाव 76, कवठेमहांकाळ 148, खानापूर 69, मिरज 281, पलूस 137, शिराळा 203, तासगाव 102, वाळवा 152, मनपा 2 हजार 252 अशी आहे.