मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेता समीर शर्मा मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. ४४ वर्षीय समीर शर्माने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
समीर शर्माने ‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राईट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूं – एक बार फिर’, ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकांमध्ये काम केले आहे. अनेक मालिकांत त्याने भाऊ, वडील, नायिकेचा भाऊ अशा व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. मालाडमधील राहत्या घरी किचनमध्ये त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अभिनेता समीर शर्मा याने मालाड पश्चिम येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे आता खळबळ उडाली असून त्याने किचनच्या सिलिंगला लटकून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आता इमारतीचे सेक्रेटरी दिनेश बुबना यांनी याबाबत अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, समीर याच्या घरातून वास येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली. त्यानंतर त्याच्या घरी जाऊन पाहिले असता त्याने आपले जीवन संपवल्याचे दिसून आले.
समीर याच्या घरातून वास येत असल्याने इमारतीच्या गार्ड त्याच्या येथे पोहचला. त्यावेळी किचनचा दरवाजा खुला असून समीर याने सिलिंकला लटकून आत्महत्या केल्याचे दिसून आले. समीर याच्या आत्महत्येप्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. समीरचा मृतदेह पाहता त्याने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा संशय मालाड पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, समीर शर्मा याने ‘ये रिश्ते है प्यार के’, ‘सास भी कभी बहु थी’, ‘कहानी घर-घर की’ सारख्या मालिकांमध्ये काम केले होते. यापूर्वी अभिनेता सुशांत याने सुद्धा राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. आता समीर शर्मानेही आत्महत्या केली आहे.