सोलापूर : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर शनिवारी सकाळी 11 वाजता सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा व उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. आज शुक्रवारी रात्री लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर हे दोन्ही मंत्री उद्या सोलापुरात मुक्कामी येणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी हे दोन्ही मंत्री आज सांत्वनपर भेट देण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर औसा येथील बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या तुळजापूर येथील निवासस्थानी हे दोन्ही मंत्री भेट देणार आहेत. आज रात्री नऊ वाजता सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात या दोन्ही मंत्र्यांचे आगमन होणार आहे.
उद्या शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता जिल्हा काँग्रेस समितीमध्ये त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन दुपारी 1 मोहोळ, पंढरपूर मार्गे माळशिरसला जाणार आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या निवासस्थानी ते सांत्वनपर भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी चार वाजता बारामतीला रवाना होणार आहेत.