कोझिकोड : केरळमधल्या कोझिकोड विमातळवर एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. हे विमान रनवे वरून घसरलं असून विमानाला मोठ नुकसान झालं आहे. यात पायलट दीपक साठेंचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा 14 वर गेल्याचे वृत्त आहे. बोईंग 737 प्रकारचे हे विमान कारीपूर धावपट्टीवरुन घसरुन अपघात झाला झाला असून विमानाचे दोन तुकडे झाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दुबईहून हे विमान कोझीकोडला आलं होतं. आई एक्स 1344 हे विमान होतं. कोझिकोड इथे धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला. केरळच्या कोझिकोडमध्ये एअर इंडिच्या विमानाला अपघात झाला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसचं हे विमान होतं. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. विमान अपघाताची माहिती मिळताच कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीसीजे) येथे अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफला सूचना देण्यात आलेल्या आहेत. आवश्यक ती सर्व मदत तातडीने पोहोचवली जात, असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पनरयी विजयन यांनी दिली आहे.
या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तसंच 4 जण तुटलेल्या विमानात अडकून पडले आहेत. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच जखमी प्रवाशांना विविध रूग्णालयात दाखल करण्यात आलंय,” असं केरळचे पोलीस महासंचालक लोकनाथ बेहरा यांनी माध्यमांना सांगितलं आहे. विमान लँड करताना ते रन वे सोडून पुढे गेल्याने हा अपघात झाल्याचं केरळचे कॅबिनेट मंत्री के राजू यांनी दिली आहे.
“कोझीकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि अग्निशमन दलाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बचाव आणि वैद्यकीय सहाय्य यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत”
– पनरयी विजयन, मुख्यमंत्री, केरळ