सोलापूर : कोरोना सृदश्य नसल्याचा बनावट प्रमाणपत्र देत जिल्हा आणि राज्याबाहेरचा जाण्याचा ई पास देणार्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला असून याप्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम विजयकुमार एकबोटे (वय 24), राहुल विजयकुमार एकबोटे (वय 28, दोघे रा. गुरूनानक चौक, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शुभम आणि राहुल हे गुरूनानक येथे शुभम ई-सेवा ऑनलाईन शॉप चालवत होते. या शॉपमधून बनावट ई-पास तयार करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पो.नि. अरूण फुगे यांना बातमीदरामार्फत मिळाली. त्यांनी या ठिकाणी जाऊन खातरजमा केली असता शुभम आणि राहूल हे डॉ. अङ्ग्रीन कलबुग्रे यांनी प्रवाशांना दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रावर खाडाखोड करत त्याची प्रिंट काढत इतर प्रवाशांना ये-जा करण्यासाठी बनावट जादा पैसे घेऊन वैद्यकीय प्रमाणपत्र देत असल्याचे आढळून आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दोघांवर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पो.उ.नि. व्ही.बी. बायस, पो.ना. संतोष येळे, सचिन गायकवाड, मंगरूळे, पो.कॉ. अर्जुन गायकवाड, वासिम शेख, इब्राहिम शेख, प्रवीण शेळकंदे, दीपक जाधव, अमोल कानडे, पूजा कोळेकर आदींनी केली.