मुंबई : अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार याच्या पक्षविरोधी भूमिकेवर सुप्रिया सुळे यांनी अधिक न ताणता ही त्याची वैयक्तिक भूमिका असू शकते, असे म्हणून विषयावर पडदा टाकला होता. मात्र आज आजोबा शरद पवार यांनी थेट काडीचीही किंमत नसल्याचे सांगत बेदखल केले. त्यामुळे पुढे पवार कुटुंबात काय होणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपला नातू पार्थ पवार यांना जाहिररित्या फटकारले आहे. पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी
करण्याची मागणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी भाष्य करत माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नसल्याचं सांगितलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
आजोबा शरद पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अप्रगल्भ आहे. मात्र, कुणाला सीबीआय चौकशी करायची असेल तर मी विरोध करणार नाही. मात्र, माझा महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल तर त्यालाही काही विरोध असण्याचं कारण नाही.” शरद पवार यांनी पार्थ पवार यांना जाहिररित्या फटकारल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.
* वडील अजित पवार शांत
अनेक दिवसांपासून दोनदा पार्थ पवारांनी पक्ष आणि आजोबा शरद पवारांविरोधात भूमिका मांडली. त्यानुसार वागले सुद्धा. यावरुन पक्षात खळबळ माजली आहे. सुप्रिया सुळेंनंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. मात्र वडील अजित पवार यांनी शांत आहेत. त्यांनी याबाबत आणखी कोणतेच स्टेटमेंट दिले नाही.