नवी दिल्ली:- कोरोना महामारीने अखंड जगाला आपल्या दबावाखाली आणले.सध्याच्या युगात जिथं इतकी स्पर्धा आहे की कोणाकडे क्षणभर थांबायला ही वेळ नाही तिथे कोरोनाने सगळ्यांना ब्रेक लावला.कोरोना विषाणूमुळे संपुर्ण मानवतेचे अस्तित्व धोक्यात आले आहे.दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे आणि त्याच्या सोबतीने कोरोनाचे बळी पण वाढत चालले आहेत.कोरोनाने कुठलाही भेदभाव न करता आपले वर्चस्व स्थापीत केले.
कोरोना येताच संपुर्ण देशात जनता कर्फ्यूचे स्वागत झाले आणि नंतर पुर्ण लॉकडाउन करण्यात आला.आज पर्यंत कोरोनाची टेस्ट पॉसिटीव्ह असलेल्या रोग्यांची संख्या 24 लाखांहून अधिक आहे.
भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहानां कोरोनाची लागण:- 2ऑगस्ट ला अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आणि याविषयी त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडल वरून माहिती दिली आणि जे कोणी आपल्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वतःला आयसोलेट करून तपासुन घ्यावे असे ही आवाहन त्यांनी केले. अमित शहाना लागण झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली.
कोरोना झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलची विचारपुस केली:- आर. डी. यादव असे या कॉन्स्टेबल चे नाव आहे याना जेव्हा कोरोनाची लागण झाली तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून काळजी घ्या आणि मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो असे सांगितले.कोरोनाच्या काळात तुम्ही खुप चांगली ड्युटी केली व आता लवकर बरे होऊन मला भेटुन जा असे सांगितले त्यावर कॉन्स्टेबलनीं आभार मानले व मी नक्की येऊन जाईन असे कळविले.