सांगली : कोरोनाचा विळखा मनपा विभागामध्ये वाढू लागला आहे. 3 हजार 436 रुग्णसंख्या मनपा विभागात झाली आहे. पूर्वी रुग्ण संखेत ग्रामीण विभाग पुढे होता. आता मनपा विभागात वाढ झाली आहे. तर मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. सांगलीत गुरुवारी तब्बल १५ कोरोनाबळी तर नव्याने 313 रुग्ण आढळले. आता एकूण रुग्णसंख्या साडेपाचहजार पार झाली असून मृत्यूचा आकडा दोनशेच्या उंबरठ्यावर आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मनपा विभागाने ग्रामीण भागाला मागे टाकले आहे. सांगली जिल्ह्यात गुरुवारच्या अहवालानुसार 15 मृत्यू तर नव्याने 313 बाधित आढळले. अहवालानुसार 2 हजार 952 जणांनी कोरोना वर मात केली आहे. सांगली जिल्ह्यात एकूण बाधित 5 हजार 577 संख्या झाली असून, एकूण मृत्यू 191 झाले आहेत. उपचाराखाली 2 हजार 434 रुग्ण आहेत.
गुरुवारी सांगली जिल्ह्यात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण पुढील प्रमाणे – तालुकानिहाय रुग्णसंख्या आहे. आटपाडी 8, जत 5,कडेगाव 13,कवठेमहांकाळ 6, खानापूर 4,मिरज 16,पलूस 16,शिराळा 2,तासगाव 22,वाळवा 9,सांगली 118, मिरज 94 असा आहे.
गुरुवारच्या अहवालातील मृतांमध्ये मिरज येथील 65, 40, 68वर्षांचे पुरुष आणि 62 वर्षांची महिला. सांगलीवाडी येथील 55 वर्षांची महिला. तासगाव येथील 77, 71 वर्षांचे पुरुष. आष्टा येथील 75 वर्षांचा पुरुष. सांगली येथील 45, 60, 78 वर्षांचा पुरुष. इनाम वाडी येथील 54 वर्षांचा पुरुष.मालगाव येथील 78 वर्षांचा पुरुष. येथील 85 वर्षांची महिला असे आहेत.
तालुकानिहाय आजअखेर पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आटपाडी 221, जत 212, कडेगाव 117, कवठे महांकाळ 198, खानापूर 103, मिरज 454, पलूस 183, शिराळा 239, तासगाव 174, वाळवा 240, मनपा 3 हजार 436 अशी आहे.