मुंबई : महेंद्रसिंह धोनीने शनिवारी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनादिवशी निवृत्त होण्याची घोषणा करुन क्रिकेट प्रेमींना धक्का दिला. स्वत:च्या कतृत्वावर त्याने क्रिकेटमध्ये भारताचे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्याच्या निवृत्तीची घोषणा वाऱ्यासारखी सर्वत्र पोहचली अन् त्याच्या अठवणीतील खेळीच्या चर्चा सुरु झाली आहे.
भारतीय क्रिकेटला नवी उंची देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती जाहीर केली . याबाबत त्याने ट्विट केले आहे. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. आयपीएलसाठी चेन्नईला उड्डाण केलेल्या धोनीने निवृत्तीची घोषणा केली. त्यापाठोपाठ सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा केली. सुरेश रैना आणि धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळतात. त्यांच्या मैत्रीचे किस्से कायमच क्रिकेट प्रेमींच्या चर्चेचा विषय असतो. दोघांनी मिळून , चेन्नईला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणारा खेळाडू म्हणून सुरेश रैनाची ओळख होती.
माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज 39-वर्षीय महेंद्र सिंह धोनी ज्याच्या नेतृत्वात भारताने दोन विश्वचषक जिंकले, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने शनिवारी 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला ब्रेक लगावला. धोनीने डिसेंबर 2004 मध्ये बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय सामने खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो आयपीएल खेळत राहिला. त्यामुळे, त्याचे चाहते अजून तरी त्याला क्रिकेटच्या मैदानावर खेळताना पाहू शकतात. धोनीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
धोनीने डिसेंबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या व्यतिरिक्त धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारी 2019 मध्ये बेंगळुरू येथे खेळला होता, तर वर्ल्ड कप सेमीफायनल (10 जुलै, 2019) त्याचा अखेरचा वनडे सामना होता. धोनीने 16 वर्षाच्या आपल्या करिअरमध्ये अनेक उपलब्धता मिळवली आहे. आयसीसीच्या तीन मुख्य ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार आहे.
* पहिला टी-20 विश्वचषक जिंकला
धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वनडे वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा मान मिळवला. इतकच नाही तर धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा स्वाद घेतला. तर आयपीएलमध्ये देखील त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने तीनदा विजयाची चव चाखली. 2004 ते 2007 या काळात धोनीची कारकीर्द चढउतार झाली. 2007 टी-20 विश्वचषकात जेव्हा सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरभ गांगुलीसारख्या खेळाडूंनी स्वत:ला त्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा धोनीला संघाची कमान देण्यात आली होती. आणि त्यानंतर त्याच्या नेतृत्वात असलेल्या एका युवा संघाने पहिला टी-20 विश्वचषक जिंकला. धोनी, एक यशस्वी कर्णधारच नाही तर सर्वोत्तम विकेटकीपर देखील राहिला. त्याने आपल्या चपळतेने स्टॅम्पिंग करत भारतासाठी अनेक सामन्यांचा निकाल बदलला.
धोनीने भारतासाठी 350 वनडे सामन्यात 50.57 च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत, ज्यात 100 शतके आणि 73 अर्धशतकांचा समावेश आहे. या दरम्यान, त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 183 अशी होती. धोनीने 90 कसोटी सामन्यांमध्ये 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत, त्यामध्ये 6 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. यावेळी, त्याची सर्वोत्तम धावसंख्या 224 धावा होती. विशेष म्हणजे, धोनीने वनडे आणि कसोटी शतक दोन्ही एकाच संघाविरुद्ध, पाकिस्तानविरुद्ध ठोकले.
* कपिलदेवनंतर महिद्रसिंह धोनीच
भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमहर्षक सामन्यात धोनीच्या अविस्मरणीय खेळीमुळे भारताला पहिला वर्ल्डकप जिंकता आला होता. माजी कर्णधार कपीलदेवनंतरचा हा दुसरा वर्ल्डकप धोनीच्या नावावर आहे. आता त्याच्यानंतर भारताला वर्ल्डकप कोण मिळवून देणार असा सवाल क्रिकेटप्रेमींना पडला आहे.
* धोनी म्हणाला, आजही पश्चात्ताप होतोय
धोनीच्या वर्ल्ड कप कामगिरीवर अनेक जण नाराज होते. त्यामुळे त्याने निवृत्ती घ्यावी असा सल्ला दिला जात होता. न्यूझीलंडविरुद्धच्या त्या सेमी फायनलमधील रन आउटमधील बोलताना म्हणाला होता आज देखील पश्चाताप होतोय. सेमी फायनल सामन्यात धोनीच्या रन आऊटबद्दल आणि त्याला इतक्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवल्याबद्दल अनेकांनी टीका केली होती.
त्यावर धोनी म्हणाला होता, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मी धावाबाद झाल्याचे दु:ख अजून माझ्या मनात आहे. तेव्हा मी का उडी मारली नाही. ‘मी स्वत:ला आजही प्रश्न विचारतो. तेव्हा मी डाईव्ह (उडी) का मारली नाही. ते दोन इंच मला नेहमी सांगत असतात की, एम.एस.धोनी तू उडी मारू शकला असतास.
* एक स्वप्न राहिले कायमच अधुरे
धोनीने अजून २ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असते, तर तो १०० टी२० सामने खेळणारा जगातील चौथा आणि भारताचा दुसराच क्रिकेटपटू ठरला असता. पण आता धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्याने त्याच्या नावावर १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्याचा विक्रम होणार नाही.
भारताकडून केवळ रोहितने १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. तसेच रोहित व्यतिरिक्त शोएब मलिक आणि रॉस टेलर यांनी १०० किंवा त्यापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारे क्रिकेटपटू –
११३ सामने – शोएब मलिक
१०८ सामने – रोहित शर्मा
१०० सामने – रॉस टेलर
९९ सामने – शाहिद आफ्रिदी
९८ सामने – एमएस धोनी