बीड : एकविसाव्या शतकात समाजातून अंधश्रद्धा जायला तयार नाही. बीड तालुक्यात अशीच अंधश्रद्धा दिसून आली आहे. बीड तालुक्यात एका देवस्थानात मुले देवाला सोडल्याची घटना उघड घडली आहे. देवाला सोडलेल्या या सर्व १२ मुलां-मुलींची सुटका करण्यात आली आहे. मात्र हे सर्व याच प्रकरणात पीडित मुलीमुळे सर्व उलगडा होऊन इतरची सुटका झाली आहे.
अंधश्रद्धेतून देवाला सोडलेल्या १२ बालकांची बीड तालुक्यात पोलीस आणि बालकल्याण समितीने सुटका केली आहे. बीड पोलीस अधीक्षकांच्या मागर्दशनखाली बीड ग्रामीण पोलिसांनी बचाव मोहीम राबवून देवस्थानमधून या बालकांना बाहेर काढले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बीड तालुक्यातील एका देवस्थानला सोडलेल्या १४ वर्षाच्या मुलीला ४० वर्षांच्या इसमाने फसवून पळवून नेल्याची घटना घडली. यानंतर मुलीच्या वडिलांनी या संबंधी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. संबंधित मुलीला बालकल्याण समिती समोर सादर केले. बाल कल्याण समितीने संबंधित मुलीचा जबाब नोंदवून घेत असताना पीडित मुलीने संबंधित देवस्थानात आणखी काही बालके पालकांनी देवाला सोडली आहेत, अशी माहिती दिली.
या माहितीवरून बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बीड ग्रामीण पोलिस आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांनी रेस्क्यु ऑपरेशन करून या १२ मुलां-मुलींची सुटका केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.