सोलापूर : मागील आठ -दहा दिवसांपासून पुणे जिल्हा परिसर तसेच घाटमाथा भीमा खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे उजनी जलाशयाचा पाणीसाठा 40 टक्क्यांवर गेला असून तीन चार दिवसात अर्धशतकाकडे वाटचाल होत आहे. बंडगार्डन तसेच दौंड येथून उजनी जलाशयात येणाऱ्या विसर्गात वरचेवर वाढ होत आहे.
सुरवातीला उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरेल का नाही? अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र आता वरचेवर पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने उजनी जलाशयामध्ये निश्चितच 100 टक्के पाणीसाठा होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उजनी जलाशयात समाधानकारक पाणीसाठा होऊ लागल्याने उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. उजनी जलाशयाच्या पाणी साठ्याकडे सोलापूर जिल्ह्यासह पुणे व अहमदनगर जिल्ह्याचेही लक्ष असते. गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील खडकवासला देवधर, भाटगर, गुंजवणे, वीर आदी धरणांत 80 टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा झाला आहे.
* उजनी जलाशयात सध्या येणारे पाणी
बंडगार्डन : 26500 क्युसेक
दौंड : 21000 क्युसेक