सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सोमवारच्या अहवालानुसार नव्याने 174 जण कोरोनाबाधित आढळून आले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत 7 हजार 878 जण बाधित झाले आहेत. अद्यापही 2 हजार 860 जण रुग्णालयात उपचार घेत असून 4 हजार 798 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
आज सोमवारच्या अहवालानुसार 1 हजार 282 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 108 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 174 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सोमवारी सर्वाधिक 47 रूग्ण पंढरपुरात तर बार्शीत 44 रूग्ण सापडले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज सात मृत्यू झालेले करमाळ्यातील बागवान नगर येथील 48 वर्षाची महिला, उपळाई रोड बार्शी येथील 45 वर्षांचे पुरुष, गांधी रोड पंढरपूर येथील 54 वर्षाची महिला, उत्पाद गल्ली पंढरपूर येथील 70 वर्षाची महिला, फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील 53 वर्षाचे पुरुष, माढा तालुक्यातील रिधोरे, येथील 70 वर्षाची महिला, तांदुळवाडी येथील 80 वर्षाच्या पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ग्रामीणमध्ये 220 इतकी झाली आहे.